शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या कार्यालयांमध्येच नाहीत ‘एलईडी’ दिवे

By admin | Updated: June 4, 2016 02:17 IST

लोकांना एलईडी दिवे घेण्यासाठी प्रोत्साहित करणा-या महावितरणच्या कार्यालयांमध्येच वापर नसल्याचे वास्तव.

अतुल जयस्वाल / अकोलाकेंद्र सरकारच्या उन्नत ज्योती अफॉर्डेबल एलईडी फॉर ऑल (उजाला) या उपक्रमांतर्गत देशभरात सुरू असलेल्या एलईडी बल्ब वितरण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी राज्यात महावितरण या वीज कंपनीकडे आहे. लोकांना एलईडी दिवे घेण्यासाठी प्रोत्साहित करणार्‍या महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवनासह इतर कार्यालयांमध्ये मात्र या दिव्यांचा वापर होत नसल्याचे वास्तव आहे. महावितरणचा हा प्रकार लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण या म्हणीचा प्रत्यय देणारा आहे. विजेची बचत व्हावी, यासाठी केंद्र सरकारने उजाला या उपक्रमांतर्गत एलईडी बल्ब वितरणाची योजना सुरू केली आहे. या योजनेस महाराष्ट्रात वीज ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. महाराष्ट्रात जुलै २0१५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी महावितरणची आहे. आतापर्यंत राज्यात पावणेदोन कोटींपेक्षाही अधिक वीज ग्राहकांनी एलईडी दिवे खरेदी केल्याची माहिती आहे. अकोला शहर व तालुक्यांच्या ठिकाणी एलईडी बल्ब वितरणाचे स्टॉल लागलेले आहेत. लोकांना ऊर्जाबचतीसाठी प्रोत्साहित करून, त्यांना एलईडी दिवे खरेदी करण्याचा सल्ला देणार्‍या महावितरणच्या कार्यालयांमध्ये मात्र जीएसएल, सीएफएल किंवा ट्यूबलाइट यांसारखे पारंपरिक दिवेच असल्याचे वास्तव ह्यलोकमतह्णने शुक्रवारी केलेल्या पाहणीत दिसून आले. अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या 'विद्युत भवन'सह महावितरणच्या शहरातील इतर कार्यालयांमध्येही उजेडासाठी पारंपरिक दिवेच लावलेले असल्याचे चित्र आहे. कार्यालयांमधील सद्याचे ट्यूबलाईट सुस्थितीत असून, ते नादुरुस्त झाल्यावर त्या ठिकाणी एलईडी दिवे बसविण्यात येतील, असे सांगण्यात आले.

कोठे काय आढळले?महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय अकोला येथे आहे. तीन जिल्हय़ांचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवन या इमारतीमधील अधिकार्‍यांचे कक्ष, सभागृह, गॅलरी आदी ठिकाणी सीएफएल दिवे किंवा ट्यूबलाइट लावलेले आहेत.महावितरणच्या अकोला ग्रामीण विभागाचे मुख्यालय असलेल्या गोरक्षण रोड स्थित इमारतीतही उजेडासाठी ट्यूबलाइट आहेत.

जिल्हय़ात ९ लाखांवर एलईडी दिव्यांची विक्रीही योजना सुरु झाल्यापासून जिल्हय़ात ९ लाख ११ हजार ६३९ एलईडी दिव्यांची विक्री करण्यात आली आहे. महावितरणने एलईडी बल्ब खरेदी करण्यासाठी वीजग्राहकांना प्रोत्साहित केले. परंतु, स्वत:च्या कार्यालयात एलईडी बल्ब लावण्याचा विसर महावितरणाला पडला.