शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

श्री गजानना अवलीया अवतरले जग ताराया

By admin | Updated: February 12, 2015 00:19 IST

शेगाव येथे श्री गजानन महाराज प्रगटदिन उत्साहात; १४१५ भजनी दिंड्यांचा सहभाग,लाखो भक्तांना महाप्रसाद.

गजानन कलोरे /शेगाव (जि. बुलडाणा) : संत श्री गजानन महाराज यांचा प्रगटदिन सोहळा लाखो भक्तांच्या उपस्थितीत आज बुधवार दि. ११ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला.तुम्ही संत मायबाप कृपावंतकाय मी प्रतीत किर्ती वर्णवूअवतार तुम्हा धराया कारणउध्दराया जन.. जंड.. जिवासंतनगरी शेगाव येथे श्री गजाननाचा हा अवतार माघ वद्य ७ ला या जड-जिवाचा उध्दार करण्यास्तव संतनगरीत १३६ वर्षापूर्वी झाला. त्यावेळी त्यांनी अन्न परब्रह्मची महंती स्वताच्या कृतीतून या विश्‍वाला सांगितली. संत श्री गजानन महाराजांचा प्रगटमहोत्सव संस्थानमध्ये आज दुपारी १२ वाजता सनई चौघडा, ढोल नगारा व हजारो भक्तांच्या जयजयकारात बेलफुले, गुलाब यांची उधळन करुन मोठय़ा भक्तीभावाने साजरा करण्यात आला. या उत्सवात राज्यभरातून १ हजार ४१५ भजनी दिंड्या सहभागी झाल्या होत्या. यामध्ये ४२ हजार ६१९ वारकरी आणि व्यवस्थेसह आलेल्या ७१ भजनी दिंड्या होत्या. यामधील निवासी दिंड्या ३८८ असून त्यांची निवासी वारकरी संख्या १९ हजार ४५0 होती. संस्थानच्या नियमाची पूर्तता केलेल्या १३३ भजनी दिंड्यांना भजनी साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच नियमाप्रमाणे सानुग्रह अंशदान (मदत) श्री संत वाड्मय वितरण, दवाखाना व्यवस्था व ८ दिंड्यांना शिधा वितरण करण्यात आले. सोबतच लाखो श्री भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.या उत्सवात सुरु झालेल्या महारुद्रस्वाहाकार यज्ञाची पूर्णाहुती संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी अध्यक्ष डॉ. रमेशचंद्र डांगरा, विश्‍वस्त निळकंठदादा पाटील, नारायणराव पाटील, गोविंदराव कलोरे, अशोकराव देशमुख, पंकजभाऊ शितूत, विश्‍वेश्‍वर त्रिकाळ, किशोरबापू टांक व चंदुलाल अग्रवाल उपस्थित होते.श्री गजानन महाराजांच्या पालखीची संस्थानच्या प्रांगणातून दुपारी २ वाजता नगरपरिक्रमा काढण्यात आली.