शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी आणि रेल्वेची परीक्षा एकाच दिवशी; विद्यार्थ्यांपुढे पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:19 IST

गत काही महिन्यांपासून एमपीएससीच्या परीक्षांचा मोठा घोळ सुरू आहे. आतापर्यंत राज्यसेवा पूर्व परीक्षा वेगवेगळ्या कारणांमुळे पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली ...

गत काही महिन्यांपासून एमपीएससीच्या परीक्षांचा मोठा घोळ सुरू आहे. आतापर्यंत राज्यसेवा पूर्व परीक्षा वेगवेगळ्या कारणांमुळे पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. एमपीएससीने राज्यसेवा पूर्व परीक्षा २१ मार्च रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाचा रेल्वेची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. रेल्वेकडून विविध पदांसाठी देशभरात विविध केंद्रांवर पाच टप्प्यांत परीक्षा घेण्यात येत आहेत.

येत्या २१ मार्चला देशभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे रेल्वेसह एमएपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आता यातील कोणतीही एकच परीक्षा देणे शक्य होणार आहे.

--बॉक्स--

रेल्वेच्या परीक्षा पूर्वनियोजित

रेल्वेच्या ३२ हजार २०८ जागांसाठी पाच टप्प्यांत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहेत. सध्या पाचव्या टप्प्यातील परीक्षा सुरू आहेत. देशभरातील १९ लाख विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. रेल्वेची पूर्वनियोजित परीक्षा असतानाही एमपीएससीनेही त्याच तारखेला परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थी एका परीक्षेपासून वंचित राहणार आहेत.

--बॉक्स--

विद्यार्थ्यांना भुर्दंड

लॉकडाऊननंतर शहरांमध्ये अभ्यास करण्यासाठी गेलेले विद्यार्थी गावी परतले आहेत. या विद्यार्थ्यांनी १४ मार्चला होणाऱ्या परीक्षेला जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षणही केले होते. मात्र, ऐनवेळेवर एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना नाहकचा भुर्दंड बसला आहे, तर आता ही परीक्षा २१ मार्च रोजी घेण्याचे जाहीर केल्याने त्यांना पुन्हा आरक्षण करावे लागत असून, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.

--बॉक्स--

लॉकडाऊनमुळे अडचण

कोरोना संसर्ग वाढत असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. तसेच हॉटेल बंद राहणार असल्याने घरच्या शिदोरीवरच परीक्षा द्यावी लागणार आहे. लॉकडाऊन असलेल्या शहरामध्ये राहण्याची सोय होणार नसल्याने परीक्षेला वेळेत पोहोचण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.

--जिल्ह्यातील १८ केंद्रांवर परीक्षा--

एमपीएससीची परीक्षा २१ मार्च रोजी होणार आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या अकोला जिल्ह्यातील १८ परीक्षा उपकेंद्रांवर ४ हजार ९९२ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेकरिता नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना १८ मार्चपर्यंतच आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.