शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

खासदार, आमदारांचा जिल्हाधिकार्‍यांकडे ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:32 IST

अकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा भूखंड बळकविण्याचा प्रयत्न करण्याचे प्रकरण ‘लोकमत’ने गत दीड महिन्यांपासून लावून धरले असल्यावरही भूमी अभिलेख विभाग दोषींना पाठीशी घालीत असल्याने खा. संजय धोत्रे, आ. रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची भेट घेऊन दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी पांडेय यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देभूखंड प्रकरण ‘लोकमत’ने केला पर्दाफाश अन् पाठपुरावा

अकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा भूखंड बळकविण्याचा प्रयत्न करण्याचे प्रकरण ‘लोकमत’ने गत दीड महिन्यांपासून लावून धरले असल्यावरही भूमी अभिलेख विभाग दोषींना पाठीशी घालीत असल्याने खा. संजय धोत्रे, आ. रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची भेट घेऊन दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी पांडेय यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.शासनाच्या मालकीचा भूखंड हडपल्यानंतर भूमी अभिलेख विभागानेच या प्रकरणाची तक्रार सिटी कोतवाली पोलिसांकडे करायला हवी होती, तसेच या प्रकरणात भूखंड हडपणारा गजराज मारवाडीसह भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना तातडीने निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हायला हवी होती, अशी तक्रार खा. संजय धोत्रे व आ. रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकारी पांडेय यांच्याकडे केली. त्यानंतर पांडेय यांनी भूमी अभिलेख विभागाच्या अधिकार्‍यांना बोलावून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले असून, त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. खा. धोत्रे व आ. सावरकर यांनी ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेनंतर दखल घेऊन प्रकरण दडपणार्‍यांवर चांगलेच ताशेरे ओढत फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. यावेळी महापौर विजय अग्रवाल, भाजपा जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, स्थायी समिती सभापती बाळ टाले, नगरसेवक अजय शर्मा यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

‘लोकमत’ने केला पर्दाफाश अन् पाठपुरावाशासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा भूखंड बळकावण्याचा पर्दाफाश ‘लोकमत’ने २ ऑगस्ट रोजी केला. त्यानंतर या प्रकरणाची केवळ चौकशीच सुरू असून, बयान नोंदविण्याचे काम करण्यात आले. भूमी अभिलेख विभाग कारवाई करण्याच्या बेतात नसल्याचे लक्षात येताच ‘लोकमत’ने या प्रकरणाचा पाठपुरावा करीत दोषींना उघड करण्याचे कार्य केले. त्यानंतर खा. संजय धोत्रे, आ. रणधीर सावकर यांच्यासह लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे दोषींवर कारवाईची मागणी केली. लोकमतच्या पाठपुराव्यानंतर अखेर चार कर्मचार्‍यांचे निलंबन, चार कर्मचार्‍यांची वेतनवाढ रोखणे आणि वरिष्ठ अधिकार्‍यांच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी पांडेय यांनी दिले आहेत.