शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

खासदार धोत्रे संसदीय समितीवर

By admin | Updated: July 9, 2017 09:46 IST

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केली निवड.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: लोकसभेच्या संसदीय कामकाजाचा प्रदिर्घ अनुभव लक्षात घेता खासदार संजय धोत्रे यांची १५ सदस्यीय संसदीय समितीमध्ये निवड करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, संसदीय कार्यमंत्री ना.व्यंकैया नायडू यांनी खा.धोत्रे यांची निवड केली. सभागृहात संसदेचे कामकाज चालविण्यासाठी नियोजनबद्द आराखडा, महत्वाचे विधेयक, विषयांची निवड आणि त्यांची मांडणी करण्यासाठी संसदीय समितीच्या सूचनांवर अंमल केला जातो. संसदेचे अधिवेशन, त्याचा कालावधी व संसदेच्या कामकाजाची आखणी अशा महत्वाच्या मानल्या जाणार्‍या १५ सदस्यीय समितीमध्ये खा.संजय धोत्रे यांची निवड करण्यात आली आहे. समितीच्या पदसिध्द अध्यक्ष असलेल्या लोकसभा अध्यक्षांच्या मान्यतेने समितीसाठी सदस्यांची निवड केली जाते. यामध्ये सभागृहातील संसदीय कामकाज मंत्री, विविध पक्षांचे गटनेते, जेष्ठ व अभ्यासू अशा १५ सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. लोकसभेच्या अधिवेशनापूर्वी चर्चेसाठी घेण्यात येणारे विषय, वेळेचे नियोजन या सर्व बाबींवर संसदीय कामकाज सल्लागार समितीमध्ये सविस्तर चर्चा केली जाते. त्यानंतर संबंधित विषयांवर संसदेत चर्चा पार पडते. खा.संजय धोत्रे यांच्या कार्यशैली, विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मत लक्षात घेता त्यांची समितीमध्ये निवड करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.