शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
7
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
8
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
9
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
10
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
11
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
12
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
13
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
14
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
15
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
16
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
17
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
18
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
20
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच

शाळा सुरू करण्याच्या हालचाली; मग महाविद्यालये का नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST

अकोला : गत दीड वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षणपद्धतीने अध्यापनाचे ...

अकोला : गत दीड वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षणपद्धतीने अध्यापनाचे कार्य सुरू होते; मात्र ऑनलाईन पद्धतीचा ग्रामीण भागात फज्जा उडाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाने नुकत्याच कोरोनामुक्त झालेल्या गावांतील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या हालचाली स्थानिक प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे, महाविद्यालये बंद असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी हा समजदार असून, कोरोना‌विषयक नियमांचे पालन करू शकतो. त्यामुळे महाविद्यालये सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून जोर धरत आहे.

कोरोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत; मात्र आता कोरोना रुग्णांची संख्या घसरत असल्याने विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोनामुक्त गावांत इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय नुकताच शासनाने घेतला असून, ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठराव घेऊन व पालकांच्या संमतीने हे वर्ग सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दुसरीकडे, शाळा सुरू होण्याच्या हालचाली वाढल्या; मात्र महाविद्यालये बंद असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा हिरमोड होत आहे. आता कोरोनाची परिस्थिती हळूहळू सावरायला सुरुवात झाली असून, शहरासह ग्रामीण भागातील महाविद्यालये सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.

-----------------------------------------------

महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास आमची तयारी पूर्ण झाली आहे. जर महाविद्यालये सुरू झाली, तर ५० टक्के उपस्थितीत वर्ग सुरू करणार आहोत. यामध्ये कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना एकत्र न बोलविता एकाचदिवशी एका शाखेतील विद्यार्थी बोलावून अध्यापन केले जाणार, असे नियोजन केले आहे. तसेच कॉलेजमधील ९९ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले आहे. शासनाने विचार करून अटी व शर्तींनुसार महाविद्यालये सुरू करावीत.

- रामेश्वर भिसे, प्राचार्य, श्री. शिवाजी महाविद्यालय, अकोला.

----------------------------------------

कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घ्यावा. महाविद्यालयीन विद्यार्थी हा १८ वर्षांवरील असल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांचे लसीकरणही झाले असणार. महाविद्यालये सुरू केल्यास तयारी पूर्ण झाली आहे. शासनाने अटी व शर्तींनुसार महाविद्यालये सुरू करावीत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

- डॉ. आर. डी. सीकची, प्राचार्य,

सीताबाई कला महाविद्यालय, अकोला.

----------------------------

महाविद्यालये बंद असल्याने अभ्यासात खंड पडला आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांसह पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. महाविद्यालये सुरू केल्यास एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. महाविद्यालये सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

- उमेश शिंदे, विद्यार्थी.

-------------------------

महाविद्यालयांबाबत शासनाने त्वरित निर्णय घेऊन सुरू करावीत. बहुतांश महाविद्यालयीन विद्यार्थांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तसेच कोरोनाविषयक नियमांचे पालनही विद्यार्थी करणार आहेत. त्यामुळे शासनाने योग्य तो निर्णय घेऊन अटी व शर्तींनुसार महाविद्यालये सुरू करावीत.

- अभिषेक जाधव, विद्यार्थी.