शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या जिल्हा, शहरप्रमुख पदासाठी ‘मातोश्री’वर हालचाली!

By admin | Updated: September 29, 2016 01:50 IST

इच्छुक दावेदार मुंबईकडे रवाना: अकोला जिल्हा, शहर कार्यकारिणी होणार बरखास्त.

आशिष गावंडे अकोला, दि. २८- जिल्ह्यासह शहरात शिवसेनेची वाटचाल लक्षात घेता, मनपा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर शिवसेना नेते तथा खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनेची जिल्हा व शहर कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाप्रमुख व शहरप्रमुख पदावर कार्यक्षम चेहर्‍याची नियुक्ती करण्यासाठी मुंबईत ह्यमातोश्रीह्णवर जोरदार हालचाली सुरू झाल्या असून, इच्छुक दावेदार बुधवारी रात्री मुंबईकडे रवाना झाले आहेत.दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शेतकरी व सर्वसामान्यांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिवसैनिकांना ह्यगाव तेथे शाखाह्ण उभारण्याचे फर्मान जारी केले होते. १९९0 च्या दशकात जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात पक्षाची पाळेमुळे घट्ट रोवण्यात सेनेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. सेनेचा सामाजिक-राजकीय व प्रशासकीय वतरुळात प्रचंड दरारा होता. मागील काही वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. सर्वसामान्य शिवसैनिकांच्या समस्यांकडे स्थानिक नेतृत्वाचे दुर्लक्ष झाले. निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजूला सारण्याच्या भूमिकेमुळे अनेक प्रामाणिक शिवसैनिकांनी इतर राजकीय पक्षाचा मार्ग स्वीकारला. काहींनी राजकारणाच्या प्रवाहातून बाजूला होणे पसंत केले. जिल्हा असो वा शहर पदाधिकार्‍यांनी पक्ष बांधणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे दोन्ही कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय शिवसेनेचे पश्‍चिम विदर्भ संपर्क प्रमुख तथा खा. अरविंद सावंत यांनी घेतल्याची माहिती आहे. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या मनपाच्या निवडणुकीसाठी पक्षाने कोणतीही पूर्वतयारी केली नसल्याचे खा. सावंत यांच्या निदर्शनास आले. पक्षात कार्यकर्त्यांंची मोडकळीस आलेली फळी पाहता, पक्षांतर्गत ठोस बदल करण्याचे संकेत खा. सावंत यांनी २४ सप्टेंबर रोजी दिले होते. त्या पृष्ठभूमीवर मुंबईत ह्यमातोश्रीह्णवर हालचाली सुरू झाल्या. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख तसेच शहरप्रमुख पदासाठी इच्छुक दावेदारांना मुंबईत ह्यहाजीरह्ण होण्याचे फर्मान जारी करताच इच्छुकांची फळी मुंबईसाठी रवाना झाली.