शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांसाठी आंदोलने उभारा!

By admin | Updated: May 7, 2017 02:47 IST

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जिल्हाप्रमुखांना आदेश.

अकोला: भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकर्‍यांवर संकट ओढवले आहे. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी बाळापूर तालुक्यात काढण्यात आलेला ह्यरुमणेह्ण मोर्चा सीमित न ठेवता संपूर्ण जिल्ह्यात शेतकर्‍यांसाठी आंदोलने उभारण्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना दिला. अकोला जिल्ह्यातील रुमणे मोर्चा यानंतर राज्यभरात आयोजित केला जाण्याचे संकेत आहेत. गतवर्षी निसर्गाने साथ दिल्याने सोयाबीन, तूर, कापसाचे भरघोस उत्पादन झाले. सोयाबीनची आवक वाढताच भावात जाणीवपूर्वक घसरण करण्यात आली. हाच प्रकार तुरीच्या बाबतीत घडला. तुरीचे भाव पाडून नाफेडमार्फत शेतकर्‍यांची तूर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तूर खरेदीची पद्धत, उपलब्ध बारदाणा, एकाच दिवशी अवघ्या काही क्विंटल तुरीचे होणारे मोजमाप आदी प्रकार पाहता तूर खरेदीवरून भाजपने शेतकर्‍यांची चेष्टा केल्याचा आरोप करत जिल्हा शिवसेनेने बंद पडलेली तूर खरेदी सुरू करण्यासाठी आंदोलन छेडल्याचे दिसून आले. शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी ५ मे रोजी बाळापूर तालुक्यात ह्यरुमणेह्णमोर्चा काढला. मोर्चात सहभागी शेतकर्‍यांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पश्‍चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चाची दखल घेत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे सविस्तर चर्चा केली. शेतकर्‍यांच्या विविध समस्यांचे जोपर्यंत निराकरण होत नाही, कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत सरकारला जागे करण्यासाठी जिल्हाभरात तीव्र आंदोलने उभारण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. जिल्हाप्रमुखांनी घेतली बैठकपक्ष प्रमुखांच्या सूचनेमुळे शिवसेनेची जिल्हा कार्यकारिणी सक्रिय झाल्याचे दिसून आले. जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी शनिवारी उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख यांची तातडीने बैठक घेतली. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. बैठकीला उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ ढोरे, निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, दिलीप बोचे, तालुका प्रमुख विजय मोहोड, अप्पू तिडके, गजानन मानतकार, संजय शेळके, श्याम गावंडे आदी उपस्थित होते. शेतकर्‍यांसाठी तीव्र आंदोलन उभारण्याचे पक्षप्रमुखांनी आदेश दिले आहेत. संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत, आमदार गोपीकिशन बाजोरिया तसेच स्थानिक पदाधिकार्‍यांसोबत चर्चा विनिमय करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल. -नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख शिवसेना