शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकलस्वाराला ट्रकने चिरडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:27 IST

बाळापूर : राष्ट्रीय  महामार्ग क्रमांक ६ वर बाळापूर-खामगाव रस्त्यावर अकोल्याकडून  खामगावकडे जाणार्‍या  मोटारसायकलस्वाराला  समोरून  येणार्‍या  ट्रकने चिरडल्याने  तो जागीच ठार झाल्याची घटना १८ सप्टेंबरच्या दुपारी ४ वाजता घडली.        

ठळक मुद्देराष्ट्रीय  महामार्ग क्रमांक ६ वर घटना घडलीट्रकने चिरडल्याने गोपाल ठोकळ जागीच ठार

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : राष्ट्रीय  महामार्ग क्रमांक ६ वर बाळापूर-खामगाव रस्त्यावर अकोल्याकडून  खामगावकडे जाणार्‍या  मोटारसायकलस्वाराला  समोरून  येणार्‍या  ट्रकने चिरडल्याने  तो जागीच ठार झाल्याची घटना १८ सप्टेंबरच्या दुपारी ४ वाजता घडली.                                      राष्ट्रीय महामार्गावरील खामगाव तालुक्यातील वाडी येथील रहिवासी गोपाळ  ठोकळ (३0) व त्यांचा मित्र श्रीकृष्ण उत्तम भागवत हे १८ सप्टेंबर रोजी एम. एच. २८ ए.व्ही. ३0९५ क्रमांकाच्या मोटारसायकलने रुग्णालयात दाखल असलेल्या त्यांच्या रुग्ण नातेवाइकाच्या भेटीसाठी अकोल्यास  गेले  होते. ते तेथून मोटारसायकलने वाडी गावाकडे परत येत असताना खामगावकडेच येणार्‍या समोरील ट्रकने एकदम ब्रेक मारला. त्यामुळे मोटारसायकलस्वारानेदेखील अचानक ब्रेक लावला. यावेळी मोटारसायकलचा उभी करताना तोल जाऊन गोपाल ठोकळ हे रस्त्यावर पडले. दुर्दैवाने समोरून वेगात येणारा  जी. जे. १९ एक्स. १५६४ क्रमांकाचा ट्रक रस्त्यावर  पडलेल्या  गोपाल ठोकळ यांच्या डोक्यावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. त्यांचा मित्र श्रीकृष्ण भागवत हे  रस्त्याच्या कडेवर पडल्याने त्यांना कुठलीही  इजा झाली नाही, तसेच मोटारसायकलचे  नुकसान झाले नाही. बाळापूर पोलिसांनी  ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा  दाखल प्रक्रिया  सुरू केली आहे. सदर अपघात  स्थळावर पोलीस उपनिरीक्षक  वाणी, काँस्टेबल कायंदे,   महामार्ग पोलीस उपनिरीक्षक  सुनील भोयर व कर्मचार्‍यांनी जखमीला सहकार्य केले .