शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आईचे दूध बाळासाठी सर्वोत्तम आहार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:08 IST

अकोला : नवजात बालकासाठी आईचे दूध हा सर्वोत्तम पोषण आहार आहे. बाळास शक्य तितक्या लवकर स्तनपान सुरू करणे गरजेचे असते. जन्मल्यानंतर सहा महिनेपर्यंत निव्वळ स्तनपान देणे हे बाळ व आईच्याही फायद्याचे असते; परंतु स्तनपानाबाबत अनेक गैरसमज समाजात दिसून येतात.

ठळक मुद्देजागतिक स्तनपान सप्ताहस्तनपान बाळ व आईच्याही फायद्याचेस्तनदा मातांना हवा सकस आहार!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नवजात बालकासाठी आईचे दूध हा सर्वोत्तम पोषण आहार आहे. बाळास शक्य तितक्या लवकर स्तनपान सुरू करणे गरजेचे असते. जन्मल्यानंतर सहा महिनेपर्यंत निव्वळ स्तनपान देणे हे बाळ व आईच्याही फायद्याचे असते; परंतु स्तनपानाबाबत अनेक गैरसमज समाजात दिसून येतात. हे गैरसमज दूर करून स्तनपानाबद्दल मातांमध्ये तसेच समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी १ ते ७ आॅगस्ट हा सप्ताह जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो.आईचे दूध बाळासाठी उत्तम पोषाहार असून, त्यात सहज पचणारी प्रथिने, जीवनसत्त्वे व खनिजे असतात. आईचे दूध पचायला सोपे असते. जन्मल्यानंतर पहिला स्राव (चिक) किंवा ‘कोलोस्ट्रोम’ बाळासाठी अत्यंत उपयुक्त असतो; परंतु काही गैरसमजुतीमुळे चिक काढून टाकला जातो. जन्मल्यानंतर बाळास शक्य तितक्या लवकर आईचे स्तनपान देणे गरजेचे असते. बाळाला चिक पाजणे म्हणजेच नैसर्गिक लसीकरण करणे होय. त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि त्याची पचनसंस्था सुधारून सुरक्षात्मक संक्रमणविरोधी वातावरण निर्माण करते. आईच्या दुधामुळे बालकाचे अ‍ॅलर्जी, अतिसार, विषाणू संसर्ग आदींपासून संरक्षण होते. बालकास सहा महिन्यांपर्यंत निव्वळ स्तनपानच करावे. त्यानंतर पुरक आहार देणे सुरू केले, तरी बाळ दोन वर्षांचे होईपर्यंत त्याला स्तनपान सुरूच ठेवावे, असा सल्ला डॉक्टर देतात.स्तनदा मातांना हवा सकस आहार!बाळ हे सर्वस्वी आईच्या दुधावर निर्भर असते, त्यामुळे आईला भरपूर दूध असणे आवश्यक असते. वयाच्या दोन वर्षांपर्यंत बाळाला स्तनपान देणे गरजेचे असते. यासाठी स्तनदा मातेने गर्भावस्थेपासूनच सकस आहार घेणे व तो पुढेही सुरू ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. माता सृदृढ व आरोग्यदायी असली, तर बाळाचे आरोग्यही चांगले राहते.बाळासाठी आईचे दूध हे अमृतसमान आहे. बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत त्याला निव्वळ स्तनपान द्यावे व त्यानंतर पुरक आहार सुरू करावा.- डॉ. कल्पना काळे,सहयोगी प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.