शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नात्याला काळीमा! चुलत बहिणीवर अत्याचार करून मातृत्व लादले

By नितिन गव्हाळे | Updated: August 3, 2023 17:08 IST

सिव्हिल लाईन्स ठाण्यातर्गंत येणाऱ्या भागात चुलत बहिण घरात एकटी असताना, तिच्यावर चुलतभावाने एकदा नव्हेतर अनेकदा बळजबरीने अत्याचार केला.

अकोला: समाजातील नितीमुल्ये, नैतिकतेचा ऱ्हास होत असल्याचे अनेक घटनांमधून दिसून येते. नात्यांनाही काळीमा फासण्याच्या अनेक घटना घडत आहेत. अशीच एक घटना शहरात घडली. अल्पवयीन चुलत बहिणीवर सातत्याने लैंगिक अत्याचार मातृत्व लादणाऱ्या नराधम युवकास अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायालय, (विशेष न्यायालय) एस. जे. शर्मा यांनी गुरूवारी १० वर्ष सक्तमजुरी कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

सिव्हिल लाईन्स ठाण्यातर्गंत येणाऱ्या भागात चुलत बहिण घरात एकटी असताना, तिच्यावर चुलतभावाने एकदा नव्हेतर अनेकदा बळजबरीने अत्याचार केला. ही बाब कोणाला सांगितली तरी तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. यातून पीडित मुलगी गरोदर राहिली. मुलीला जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथे भरती केले असता, तेथे तिची प्रसूती झाली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने डॉक्टरांनी ही बाब पोलिसांना कळवली. पोलिसांनी मुलीची चौकशी केल्यानंतर गुन्हा घडल्याची बाब उघडकीस आली. १० फेब्रुवारी २०१५ रोजी चौकशी दरम्यान पीडितेच्या घेतलेल्या जबाबानुसार गुन्हा दाखल आला.

पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षाने एकूण ७ साक्षीदार तपासले. न्यायालयाने साक्षी व पुरावे ग्राह्य मानुन भादंवि कलम २३५, ३७६(२)(फ) नुसार १० वर्ष सक्तमजुरीचा कारावास, ५ हजार रूपये दंड, न भरल्यास, एक वर्ष साधा कारावास तर कलम ५०६ मध्ये १ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ५ हजार रूपये दंड, न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. सर्व शिक्षा आरोपीस एकत्रित भोगवयच्या आहेत. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील किरण खोत यांनी बाजू मांडली. प्रकरणाचा तपास तत्कालीन पीएसआय संजय रामहीत मिश्रा यांनी केला होता. पोस्टे पैरवी म्हणून हेडकॉन्स्टेबल गावंडे, प्रिया गजानन शेगोकार यांनी सहकार्य केले.या आरोपातून आरोपी निर्दोषया प्रकरणात घटनेच्या वेळी पीडित मुलगी अल्पवयीन होती याचा समाधानकारक पुरावा उपलब्ध न झाल्याने पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमामधून आरोपीस न्यायालयाने निर्दोष असल्याचा निर्णय दिला.

टॅग्स :Akolaअकोला