शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भक्ताच्या हाकेला धावणारी माता..!

By admin | Updated: September 26, 2014 01:50 IST

कुरणखेड येथील चंडिकादेवीं.

मूर्तिजापूर : अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर कुरणखेड नावाच्या खेड्यातील एका टेकडीवर आदीशक्ती चंडिका देवी (माता) पंचक्रोशीतच नव्हे तर जिल्ह्यासह विदर्भात भक्ताच्या हाकेला धावणारी माता म्हणून भाविकांचे श्रद्घास्थान आहे. प्राचीन काळात कुरणखेड हे गाव कुंचनपूर ओळखले जायचे. या परिसरात कुंतनपूर राजा नरेश यांचे राज्य होते. आपल्या राज्यातील जंगलात फेरफटका मारत असताना घनदाट जंगलातील एका टेकडीजवळील जागा व कोणातरी या जागेची व्यवस्था व राखण करीत असल्याचे राजाच्या दृष्टिक्षे पात आले. उत्सुकतेपोटी राजाने दुसर्‍या दिवशी सकाळी त्या जागेवर जाण्याचे योजून त्या ठिकाणावर गेला असता या निर्मनुष्य जंगलात त्या जागेला एक सिंह आपल्या शेपटीने त्या परिसराची स्वच्छता करीत असल्याचे दिसले. तेव्हापासून या आदीशक्ती मातेचे नाव चंडिका माता पडल्याची आख्यायिका आहे. कुंचनपूर गाव मंदिराचा उल्लेख पांडव प्रताप गं्रथातील चंद्रहास्य राजाच्या कथेत आला असल्यामुळे हे मंदिर पुरातन काळातील असल्याची पुष्टी मिळते. सध्याही हा परिसर निसर्गरम्य असून, या चंडिका माता मंदिर परिसरातून काटेपूर्णा नावाची नदी उत्तर दिशेकडे धावते आणि वैशिष्ट्ये असे की, देवीचे मंदिरसुद्घा उत्तरमुखी आहे. काटेपूर्णा नदीने या परिसराला सुशोभित केले असून, ही हिरवळ भाविकांना, पर्यटकांना आकर्षित करते. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने म्हणावे त्या प्रमाणात अजून लक्ष घातले नाही, ही शोकांतीका म्हणावी लागेल.