शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पातूर तालुक्यातील मोर्णा मध्यम प्रकल्प ‘ओव्हर-फ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:20 IST

पातूर : तालुक्यात संततधार पाऊस सुरू असून, तलाव, प्रकल्प तुडुंब भरले आहे. तालुक्यात जून-सप्टेंबरदरम्यान ९१ टक्के पाऊस पडला आहे. ...

पातूर : तालुक्यात संततधार पाऊस सुरू असून, तलाव, प्रकल्प तुडुंब भरले आहे. तालुक्यात जून-सप्टेंबरदरम्यान ९१ टक्के पाऊस पडला आहे. तालुक्यातील मोर्णा-निर्गुणा दोन मध्यम प्रकल्पांसह सात लघुपाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. पावसाची हजेरी कायम असल्याने सोयाबीन, कपाशी, तूर आदी खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तालुक्यातील मोर्णा प्रकल्प शंभर टक्के भरला असून, गेल्या दोन दिवसांपासून ओव्हर फ्लो सुरू झाला आहे. यापूर्वीच तालुक्यातील दुसरा निर्गुणा प्रकल्पाचाही विसर्ग सुरू झाला आहे. त्याबरोबरच तालुक्यातील तुळजापूर लघुपाटबंधारे प्रकल्प ७१.१२ टक्के भरला असून, उर्वरित गावंडगाव, सावरगाव, पातूर तलाव, विश्वामित्री, झरंडी आणि हिवरा सदर प्रकल्प शंभर टक्के भरलेले आहेत. पातूर तालुक्यात जून-सप्टेंबरदरम्यान आतापर्यंत ८०१.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत सरासरी १६ टक्के कमी असून, या वर्षीचा तब्बल ९१ टक्के पाऊस झाला आहे. गत दोन दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. तालुक्यात सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे.

-----------------------------

रब्बीची चिंता मिटली, मात्र खरीप धोक्यात!

तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने प्रकल्प, तलाव शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे रब्बी हंगामात पाणी मिळण्याची आशा वाढल्याने शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची चिंता मिटली आहे; मात्र सततचा पाऊस सुरू असल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात सापडले आहेत. अवघ्या काही दिवसावर सोयाबीन सोंगणी आली असताना पाऊस सुरू असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. तालुक्यातील उडीद, मूग हातचे गेले आहेत. त्याबरोबरच कपाशीवरही रोगराई आली आहे.

--------

तालुक्यात संततधार पाऊस असल्याने सोयाबीनचे पीक संकटात सापडले आहे. गतवर्षीही खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाले होते. यंदाही अशीच स्थिती असल्याने चिंता वाढली आहे. संतोष घुगे, पास्टूल.

-------------

गतवर्षी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यंदाही फुलगळ, पातेगळ व बोंडसळ झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. - स्वप्निल कोकाटे, शिर्ला.

250921\2504screenshot_20210925_154644.jpg

मोर्णा ओव्हरफ्लो