शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

जलपर्णीच्या विळख्यातून मुक्त होतेय मोर्णा, अडीच किमीपर्यंतचे पात्र स्वच्छ

By नितिन गव्हाळे | Updated: April 15, 2024 21:38 IST

महापालिकेचे प्रयत्न सुरू, पण सांडपाण्याचे काय करणार ?

अकोला: शहरातील मोर्णा नदीला जलपर्णीचा विळखा पडला आहे. नदीचे पात्र जलपर्णीने पूर्णपणे व्यापले आहे. ही जलपर्णी काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली असून, गत महिनाभरापासून नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. आता अडीच किमीपर्यंतचे पात्र स्वच्छ करण्यात आले असून, हळूहळू मोर्णामाय जलपर्णीच्या विळख्यातून मुक्त होत आहे; पण नदीपात्रात शहरातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याचे काय ? या सांडपाण्यामुळे नदीचे प्रदूषण वाढत आहे.

मोर्णा नदी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे केंद्र अस्तित्वात नाही. यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी व दुर्गंधीयुक्त काळसर पाणी तयार होऊन जलचर व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. गत महिनाभरापासून महापालिका प्रशासनाने मोर्णा नदीची स्वच्छता मोहीम हाती घेतली असून, दोन पोकलॅन्ड, जेसीबीच्या माध्यमातून महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपायुक्त गीता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा हे दररोज जलपर्णी काढण्यासाठी परिश्रम घेत आहेत. केवळ ५ ते ६ लाख रुपयांच्या निधीतून हे काम होत आहे. यापूर्वी नदी स्वच्छतेवर ३० ते ३५ लाख रुपये खर्च यायचा. कमी खर्चात स्वच्छतेचे काम होत आहे. नदी स्वच्छ होत असली तरी नदीमध्ये दररोज शहरातून येणाऱ्या सांडपाण्यामुळे डास, कीटकांचा प्रादुर्भाव वाढत आहे. उद्योगांतून सोडले जाणारे सांडपाणी, ग्रामीण परिसरातील गटारीमधून येणारे प्रदूषित पाणी, मैलायुक्त सांडपाणी नदीपात्रात सतत मिसळत आहे. यावर महापालिकेला उपाययोजना करण्याची गरज आहे.

तर नदीत सुरू होऊ शकते बोटिंगमहापालिकेच्या वतीने मोर्णा नदीपात्रातील दररोज जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नदीचे पात्र स्वच्छ होत आहे. शहरातील सांडपाणी सोडले जात असल्यामुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचलेले आहे. हे सांडपाणी बंद करून पावसाळ्यात नदीला आलेल्या पाण्यावर काही गावांमध्ये बांध बांधून महापालिका प्रशासनाला या ठिकाणी बोटिंग सुरू करण्याची संधी आहे. यातून महापालिकेला महसूल आणि अनेक हातांना रोजगार मिळू शकतो.एसटीपी केंद्र होणे आवश्यकनदी पात्रात सोडण्यात येणारे सांडपाणी थांबवून किंवा सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या उद्देशाने महापालिका प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया केंद्रासाठी महापालिका प्रशासनाने (एसटीपी) सर्व्हे करून केंद्र उभारावे.

टॅग्स :Akolaअकोला