शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पाच जिल्ह्यांतील आयुक्तांचे निरीक्षण ठरले औपचारिकता; २० हजारांपेक्षाही अधिक आक्षेप कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 13:39 IST

अकोला : ग्रामविकास विभागाची धुरा हाकणाऱ्या जिल्हा परिषदेतील विविध प्रशासकीय, विकास कामांतील अनियमिततांवर बोट ठेवून त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडून केले जाणारे वार्षिक निरीक्षण केवळ औपचारिकता ठरत आहे.

अकोला : ग्रामविकास विभागाची धुरा हाकणाऱ्या जिल्हा परिषदेतील विविध प्रशासकीय, विकास कामांतील अनियमिततांवर बोट ठेवून त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडून केले जाणारे वार्षिक निरीक्षण केवळ औपचारिकता ठरत आहे. अमरावती विभागात २००३ पासून आयुक्तांच्या निरीक्षणातील निकाली न निघालेले २० हजारांपेक्षाही अधिक आक्षेप केवळ कागदावर आहेत. पंचायत राज समितीने त्या आक्षेपावरही बोट ठेवल्याने आता ठरावीक काळात ते निकाली काढण्याची कसरत सुरू झाली आहे.जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायतीचे प्रशासन, विकास कामे, योजनांचा खर्च योग्य पद्धतीने सुरू आहे की नाही, या बाबींची पडताळणी करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे वार्षिक निरीक्षणाची जबाबदारी आहे. या निरीक्षणात प्रशासकीय, विकास कामांच्या खर्चातील अनियमितता उघड होऊन त्या दुरुस्त करण्यासाठी संबंधितांना संधी दिली जाते. गेल्या काही वर्षात अमरावती विभागीय आयुक्तांनी निरीक्षण तर केले. त्यामध्ये आढळलेल्या अनियमिततेसंदर्भातील आक्षेपावर काहीच झाले नाही. हा प्रकार तब्बल २००३ पासून सुरू आहे. त्यामुळे विभागातील पाच जिल्हा परिषदांमध्ये २० हजारांपेक्षाही अधिक आक्षेप कागदावरच असल्याचा साक्षात्कार काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयाला झाला. आता ते आक्षेप तातडीने निकाली काढण्यासाठी पाचही जिल्हा परिषदेत कॅम्प घेऊन संबंधितांना धारेवर धरले जात आहे. त्यामध्ये अकोला जिल्हा परिषदेतील आक्षेपांची संख्या ४४०० पेक्षा अधिक आहे. गेल्या आठवड्यात त्यासाठी विभागीय आयुक्तांच्या पथकाने जिल्हा परिषदेत भेट देत आक्षेप निकाली काढण्याचे वेळापत्रक ठरवून दिले.

- ‘पीआरसी’च्या औरंगाबाद दौºयात उघड झाला गोंधळविभागीय आयुक्त कार्यालयाला अचानकपणे आक्षेपांची आठवण होण्याचे कारणही तसेच आहे. काही दिवसांपूर्वी पंचायत राज समितीने औरंगाबाद विभागातील जिल्हा परिषदेच्या दौºयात आयुक्तांच्या निरीक्षणातील आक्षेपावर काय केले, हा मुद्दाही विचारला. तेथेही आक्षेपावर काहीच झाले नसल्याचे पुढे आले. त्यामुळे अमरावती विभागातील आक्षेप तातडीने निकाली काढण्यासाठी कॅम्पचा धडाका लावण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद