शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या हद्दवाढीवर एप्रिल महिन्यात शिक्कामोर्तब!

By admin | Updated: March 5, 2016 02:45 IST

मनपा आयुक्तांची सचिवांसोबत चर्चा.

अकोला: महापालिकेच्या हद्दवाढीवर एप्रिल महिन्यात शिक्कामोर्तब होईल. हद्दवाढीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी १ मार्च रोजी स्वाक्षरी केल्यानंतर या प्रक्रियेला वेग आला आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त अजय लहाने यांनी शुक्रवारी नगर विकास विभागाच्या सचिवांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे. येत्या पंधरा दिवसात शासनाकडून प्राथमिक अधिसूचना जारी होईल. महापालिक ा क्षेत्राची हद्दवाढ करण्याच्या दिशेने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. २00१ मध्ये मनपा अस्तित्वात आल्यानंतर मनपा हद्दवाढीचा पहिला प्रशासकीय प्रस्ताव २00२ मध्ये शासनाकडे सादर करण्यात आला होता. यामध्ये मनपा क्षेत्रालगतच्या सुमारे २१ गावांचा समावेश करण्याचे प्रस्तावित आहे. मनपा प्रशासनाच्या वतीने अकोलेकरांना रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा आदी मूलभूत सुविधा दिल्या जात असल्या तरी या सुविधांवर शहरानजीकच्या गावांचा ताण पडत असल्याची परिस्थिती आहे. हद्दवाढ झाल्यास मालमत्तांच्या संख्येत वाढ होऊन त्यापासून मनपाला महसूल प्राप्त होऊ शकतो. यादरम्यान, शहरासह २१ गावांमधील लोकसंख्येची माहिती सादर करण्याचे निर्देश नगर विकास विभागाने मनपाला दिले होते. त्यानुषंगाने शहरालगतच्या गावांचे नकाशे, शहराला जोडल्या जाणार्‍या सीमारेषा, गावांतील लोक संख्या, त्यांचे दरडोई उत्पन्न आदी इत्थंभूत बाबींचा अहवाल प्रशासनाने तयार करून जिल्हाधिकार्‍यांमार्फत अमरावती विभागीय कार्यालय आणि तेथून नगर रचना संचालनालय (पुणे)कडे पाठवला. पुणे कार्यालयाने प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर आयुक्त अजय लहाने यांनी फेब्रुवारी महिन्यात हा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे सादर केला. यादरम्यान, मुख्यमंत्र्यांनी १ मार्च रोजी प्रस्तावाला मंजुरी दिली. येत्या पंधरा दिवसात हद्दवाढीसंदर्भात हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी शासनाकडून प्राथमिक अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. या विषयावर शासनाची भूमिका लक्षात घेता, एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंंत हद्दवाढीला मंजुरी मिळणार असल्याची माहिती आहे.