शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या स्मारकासाठी अकोल्यातून गेली होती ९ रुपयांची मनिऑर्डर!

By admin | Updated: April 14, 2015 00:14 IST

हातरूणच्या तुकाराम डोंगरेंची अशीही भीमनिष्ठा.

अकोला- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत योगदान देणार्‍या भीमसैनिकांची मोठी संख्या जिल्ह्यात आहे. त्यापैकीच एक असलेल्या तुकाराम डोंगरे यांनी १९६४ मध्ये बाबासाहेबांच्या स्मारकासाठी हातरूणसारख्या छोट्याशा गावातून त्यावेळी ९ रुपयांची मनिऑर्डर पाठविली होती. बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने या आठवणीला उजाळा मिळाला आहे. बाळापूर तालुक्यात असलेल्या हातरूण येथे राहणारे तुकाराम गोंदाजी डोंगरे यांनी मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सभा प्रत्यक्ष बघितली होती. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या काळापासून ते आंबेडकरी चळवळीत एकनिष्ठेने कार्यरत आहेत. १९६४ मध्ये चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देशभरातून आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला होता. त्यावेळी हातरूण येथून डोंगरे यांनी ९ रुपयांची मनिऑर्डर पाठविली होती. ही मनिऑर्डर ७ मे १९६४ रोजी भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने भैयासाहेब ऊर्फ यशवंतराव आंबेडकर यांनी स्वीकारली होती. त्यांच्या स्वाक्षरीची पोचपावती आणि मनिऑर्डरची प्रत आजही डोंगरे यांनी जपून ठेवली आहे. कौटूबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची अस तानादेखील बाबासाहेबांच्या स्मारकासाठी त्याकाळी स्वकमाईतून ९ रुपये देण्याचे औदार्य डोंगरे यांनी दाखविले होते. केवळ बाबासाहेबांवरील निष्ठेमुळेच त्यांनी पोटाला चिमटा घेऊन बाबासाहेबांचे स्मारक उभे रहावे म्हणून खारीचा वाटा उचलला होता.

*बाबासाहेबांनी दिली होती  प्रबुध्द भारतची पावती !

        बाबासाहेबांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या काळापासून आंबेडकरी चळवळीत एकनिष्ठेने कार्यरत तुकाराम डोंगरे हे ह्य प्रबुद्ध भारतह्णचे वार्षिक वर्गणीदार होते. त्यांना बाबासाहेबांनीच प्रत्यक्ष प्रबुद्ध भारत सभासद वर्गणीची पोच दिली होती. डोंगरे यांनी हा अनमोल ठेवा आजही जपून ठेवला आहे.