शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

‘मान्सून’ परतीचे लागले वेध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 02:03 IST

अकोला :  परतीच्या पावसाचे आता वेध लागले असून, येत्या दोन दिवसांत हा पाऊस परतीला निघण्यासाठीची हवामानाची स्थिती राजस्थानमध्ये निर्माण झाली आहे. सामान्य मान्सून ३0 सप्टेंबरपर्यंत असतो; पण विदर्भातून तो १0 ऑक्टोबरपर्यंत परतीला निघण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्दे३0 सप्टेंबरपर्यंत मान्सूनविदर्भातील १0 ऑक्टोबरपर्यंत होईल चित्र स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  परतीच्या पावसाचे आता वेध लागले असून, येत्या दोन दिवसांत हा पाऊस परतीला निघण्यासाठीची हवामानाची स्थिती राजस्थानमध्ये निर्माण झाली आहे. सामान्य मान्सून ३0 सप्टेंबरपर्यंत असतो; पण विदर्भातून तो १0 ऑक्टोबरपर्यंत परतीला निघण्याची शक्यता आहे. विदर्भात यावर्षी सरासरी २२ टक्के पावसाची तूट आहे. २0 टक्के तूट ही सामान्य असल्याने येत्या ३0 सप्टेंबरपर्यंत पाऊस आल्यास ही तूट भरू न निघण्याची शक्यता आहे; परंतु सार्वत्रिक पावसाचे आता कोणतेही चिन्हं नसून, तुरळक एखाद्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात पावसाळ्य़ात जो पाऊस झाला, त्याचे स्वरू प सार्वत्रिक नव्हतेच. त्यामुळे धरणामंध्ये अपेक्षित जलसाठा संचयित झाला नाही. सोमवारी पश्‍चिम उत्तर प्रदेश व लगतच्या भागावरील कमी दाबाचे क्षेत्र आता विरू न गेले  आहे. गेल्या चोवीस तासांत कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तसेच कोकण-गोव्यात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात आता पावसाचे कोणतेही संकेत नाहीत. दरम्यान, ३0 सप्टेंबरपर्यंत पडणारा पाऊसच मान्सूनच्या पावसामध्ये समाविष्ट करता येतो. त्यानंतर येणार्‍या पावसाची गणना ही अवकाळी पावसात केली जाते. दरम्यान, यावर्षी पूरक पाऊस नसल्याने विदर्भातील भूगर्भातील जलसाठय़ात वाढ झाली नसून, धरणातही पूरक जलसाठा नाही. तसेच ३0 सप्टेंबरपर्यंत सार्वत्रिक दमदार पावसाचे कोणतेही संकेत नसल्याने यावर्षी धरणांतील र्मयादित साठय़ाचे काळजीपूवर्क नियोजन करणे क्रमप्राप्त आहे.

राजस्थानमध्ये परतीच्या पावसाला पूरक परिस्थिती निर्माण झाली असून, येत्या दोन दिवसांत तो परतीला निघण्याची शक्यता आहे. ३0 सप्टेंबरपर्यंत विदर्भात सामान्य पावसाळा असतो, त्यानंतर परतीला निघतो. यावर्षी तो १0 ऑक्टोबरनंतर परतीला निघण्याची शक्यता आहे. विदर्भातील हवामान सध्या कोरडे आहे. त्यामुळे येत्या तीन-चार दिवस पावसाची शक्यता नाही.- ए.डी. ताठे,विभागीय संचालक, हवामानशास्त्र,विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड,नागपूर.