शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा संपल्यानंतर लागला पावसाळा!

By admin | Updated: April 14, 2015 00:20 IST

ऑक्टोबर ते एप्रिलपर्यंत २६५ मि.मी.झाला पाऊस ; ऋतूचक्र बदलले?

अकोला : पावसाळा संपल्यानंतर पावसाळा लागल्याचे चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे. ऑक्टोबर ते एप्रिलपर्यंत २६५ मि.मी. पावसाची नोंद नागपूर हवामानशास्त्र विभागाने केली आहे. यावर्षी प्रत्येक महिन्यात पाऊस येत असल्याने ऋ तूचक्र बदलल्याचे हे संकेत मानले जात आहेत. अकोला जिल्हय़ात सरासरी पावसाचे प्रमाण हे ७00 मि.मी.च्यावर आहे. मागीलवर्षी पावसाने पाठ फिरवली. यावर्षी पावसाचा कालावधी समजल्या जाणार्‍या जून ते सप्टेंबर या चार महिन्यात केवळ ५७२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर २0१४ पासून ते एप्रिल २0१५ पर्यंत २६५ मि.मी. पावसाची नोंद झाली. अद्याप पावसाची शक्यता कायम असून, मागील वर्षी पडलेल्या पावसाची सरासरी हा पाऊस गाठतो की काय, असेच एकूण चित्र आहे. २0१२-१३ या जिल्हय़ात केवळ ६७४ मि.मी. पाऊस पडला. २0१३-१४ मध्ये ८९४ मि.मी. पाऊस झाला आणि १४-१५ मध्ये पावसाळ्य़ात केवळ ५७२ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. डिसेंबरपर्यंत या पावसाची ६८0.७0 मि.मी. नोंद झाली आहे. या पाच वर्षांत पावसाचे सरासरी चित्र बदलले असून, कधी कमी तर कधी जास्त, असे या पावसाचे स्वरू प आहे. २0१४-१५ या वर्षात १४0 मि.मी. पाऊस २३ जुलै व ९0 मि.मी. पाऊस ८ सप्टेंबर या एकाच दिवशी पडला आहे. म्हणजेच पावसाळ्य़ातील अर्धापाऊस हा एकाच दिवशी काही तासात कोसळत असल्याचे या पावसाच्या आकडेवारीवरू न निदर्शनास येत आहे. यासंदर्भात डॉ कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. सुभाष टाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पावसाळय़ाचे स्वरू प बदलले असल्याचे सांगीतले. अलीकडच्या काही वर्षात सरासरी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. संपूर्ण पावसाळ्य़ा तील पाऊस हा १६ ते १८ तासात पडत असून, अवेळी पाऊस वाढला आहे. संपूर्ण पावसाळ्य़ात गेल्यावर्षी केवळ ५७२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. परंतु त्यानंतर आजपर्यंत २५0 मि.मी. च्यावर पाऊस पडला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.