शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या ‘फैजान’कडून आर्थिक लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:25 IST

अकोला : महापालिकेतील नगररचना विभाग, जलप्रदाय विभाग,  बांधकाम विभागातील कामकाज सुरळीत चालावे, यासाठी  प्रशासनाने तांत्रिक संवर्गासाठी कंत्राटी तत्त्वावर अभियंत्यांची नियुक्ती  केली. एका कंपनीच्या माध्यमातून महापालिकेत दाखल झालेल्या  ‘फैजान’ने अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत उत्तर झोनमधील  मालमत्ताधारकांच्या नाकीनऊ आणल्याची माहिती समोर आली  आहे. इमारतीचे अनधिकृत बांधकाम असल्याच्या सबबीखाली  अकोलेकरांची आर्थिक लूट चालवल्याची बाब प्रशासनाने गंभीरतेने  घेतली असून, सदर कंत्राटी कर्मचार्‍याची हकालपट्टी करण्याचे संके त दिले आहेत. 

ठळक मुद्देमनपाची दखलकंत्राटी कर्मचार्‍याची होणार हकालपट्टी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेतील नगररचना विभाग, जलप्रदाय विभाग,  बांधकाम विभागातील कामकाज सुरळीत चालावे, यासाठी  प्रशासनाने तांत्रिक संवर्गासाठी कंत्राटी तत्त्वावर अभियंत्यांची नियुक्ती  केली. एका कंपनीच्या माध्यमातून महापालिकेत दाखल झालेल्या  ‘फैजान’ने अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत उत्तर झोनमधील  मालमत्ताधारकांच्या नाकीनऊ आणल्याची माहिती समोर आली  आहे. इमारतीचे अनधिकृत बांधकाम असल्याच्या सबबीखाली  अकोलेकरांची आर्थिक लूट चालवल्याची बाब प्रशासनाने गंभीरतेने  घेतली असून, सदर कंत्राटी कर्मचार्‍याची हकालपट्टी करण्याचे संके त दिले आहेत. महापालिका म्हणजे भ्रष्ट कामकाजाचे कुरण, असा आजपर्यंतचा  समज होता. मनमानी पद्धतीने कामकाज करायचे, सर्वसामान्य  नागरिकांना वेठीस धरून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रकार आता  इतिहासजमा झाले आहेत. तरी सुद्धा मनपात कंत्राटी पद्धतीवर  कामकाज करणार्‍या काही नवख्या कर्मचार्‍यांचे हात अद्यापही  शिवशिवत असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या नगररचना,  जलप्रदाय, बांधकाम, विद्युत आदी विभागांमध्ये तांत्रिक संवर्गातील  कर्मचार्‍यांचा अभाव असल्याचे लक्षात घेऊन आयुक्त अजय लहाने  यांनी तांत्रिक संवर्गासाठी कर्मचार्‍यांची तात्पुरत्या कालावधीसाठी  नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. कर्मचार्‍यांना मानधनावर नियुक्त  केल्यास ते भविष्यात सेवेत कायम करण्याचा दावा करतात, ही बाब  पाहता एका खासगी कंपनीच्या माध्यमातून ‘आउट सोर्सिंग’द्वारे  कर्मचार्‍यांची नियुक्ती केली. तीन महिन्यांपासून सर्व काही सुरळीत  सुरू असताना अचानक उत्तर झोनमध्ये नियुक्त केलेल्या ‘फैजान’ने  इमारती अनधिकृत असल्याची बतावणी करीत  मालमत्ताधारकांजवळून पैसे उकळण्याचे काम सुरू केल्याचा प्रकार  प्रशासनाच्या निदर्शनास आला आहे. प्रशासनाचा कर्मचारी  असल्यामुळे नागरिकांनी कारवाईच्या भीतीपोटी आर्थिक व्यवहार पार  पाडले. 

नगरसेविका पतीची संगत भोवली!उत्तर झोनमधील एका नगरसेविकेच्या पतीने सदर कर्मचार्‍याला हा ताशी धरून मालमत्ताधारकांना धमकावण्याचे प्रकार केले. हा प्रकार काही व्यावसायिक, रहिवाशांनी दुसर्‍या एका  नगरसेविकेच्या पतीसमोर कथन केला. मालमत्ता दाखवणारा नगरसेविका पती आणि सदर कर्मचार्‍याची  ऐशीतैशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. 

अतिरिक्त आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्षअकोलेकरांची आर्थिक लूट करणार्‍या कं त्राटी कर्मचार्‍याचा  अहवाल उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी जी.एम. पांडे यांनी अतिरिक्त  आयुक्त दीपक पाटील यांच्याकडे सादर केल्याची माहिती आहे. या  प्रकरणी दीपक पाटील काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.