लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग करणार्या नायगाव येथील युवकाला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि त्याच्या सहकारी मित्रास ५00 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. बारावीमध्ये शिकणारी १७ वर्षीय मुलगी शिकवणी वर्गावरून घरी जात असताना, आरोपी शाहरूख ऊर्फ काल्या फिरोज गौरवे आणि त्याचा मित्र अकील इब्राहिम परशुवाले(दोघेही रा. नायगाव) यांनी तिचा पाठलाग केला आणि तिला अडविले. शाहरुख गौरवे याने मुलीचा हात पकडून मित्र अकील याला ही आपली प्रेयसी असल्याचे सांगितले आणि तिचा विनयभंग केला. ही घटना ८ जून २0१६ रोजी तार फैलातील सरकारी गोडाउनजवळ घडली होती. या प्रकरणात अकोट फैल पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३५४, ५0६, पॉस्को कलम ७, ८ नुसार गुन्हा दाखल केला होता. पीएसआय शैलेश म्हस्के यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.जी. भालचंद्र यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने पाच साक्षीदार तपासले. न्यायालयात आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने, न्यायालयाने आरोपी शाहरूख ऊर्फ काल्या गौरवे याला तीन वषार्ंचा सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड, न भरल्यास तीन महिन्यांचा कारावास आणि अकील परशुवाले याला ५00 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पीडित मुलीची बाजू सहायक सरकारी विधिज्ञ मंगला ए. पांडे यांनी मांडली.
मुलीचा विनयभंग; युवकास कारावास, सहकारी मित्राला ५00 रुपयांचा दंड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 02:39 IST
अकोला : अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग करणार्या नायगाव येथील युवकाला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि त्याच्या सहकारी मित्रास ५00 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
मुलीचा विनयभंग; युवकास कारावास, सहकारी मित्राला ५00 रुपयांचा दंड!
ठळक मुद्देन्यायालयाचा निकाल