शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

मोदीच हवेत; पण भ्रष्टाचाराला आळा बसवा! ; अकोला ते पातूर प्रवासादरम्यान प्रवाशांचा सूर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:45 IST

राष्ट्रहिताचा मुद्दा लक्षात घेता चीन व पाकिस्तानाला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधानपदी मोदीच हवेत; पण भ्रष्टाचारालाही आळा बसावा असा सूर अकोला ते पातूर प्रवासादरम्यान एसटीतील प्रवाशांमधून उमटला.

अकोला: उण्यापुऱ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारने जागतिक स्तरावर भारताचे स्थान मजबूत केल्याचे पाकिस्तानवरील हल्ल्यावरून दिसून आले. पुलवामातील भ्याड हल्ल्यानंतर जगातील प्रमुख देश भारताच्या बाजूने उभे होते. यावरून भारताचे नेतृत्व कणखर असल्याचे दिसते. राष्ट्रहिताचा मुद्दा लक्षात घेता चीन व पाकिस्तानाला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधानपदी मोदीच हवेत; पण भ्रष्टाचारालाही आळा बसावा असा सूर अकोला ते पातूर प्रवासादरम्यान एसटीतील प्रवाशांमधून उमटला.अकोला ते पातूर प्रवासादरम्यान एसटी बसमध्ये सतीश देशमुख यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर केंद्र व राज्य शासनाने आणखी कठोर पाऊले उचलण्याची मागणी केली. भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सर्वसामान्यांना कमालीचा मानसिक त्रास होतो. आर्थिक शोषणाला आळा घालण्यासाठी शासनाने कायद्यात सुधारणा करण्याची मागणी त्यांनी केली. केंद्रात भाजप असो वा काँग्रेस सरकार त्यांनी देशहितासोबतच विकासाला प्राधान्य देण्याचे मत देशमुख यांनी मांडले. मोहन शर्मा म्हणाले की देशाचे नेतृत्व करणारा व्यक्त कणखर व सक्षम असला पाहिजे. आजच्या घडीला असे नेतृत्व लाभल्याचे दिसून येते. केवळ पदासाठी एकत्र येणाºया राजकीय पक्षांना दूर सारण्याची गरज आहे. त्यामुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोणीही असो, सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची हीच वेळ असून, मतदानाच्या माध्यमातून शक्य असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. मागील पाच वर्षांच्या कालावधीत केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात कामे केली. आजपर्यंत इतर राजकीय पक्षांना वारंवार संधी देण्यात आली. त्याचे परिणामही दिसून आले. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा मोदी यांच्या पारड्यात मतांचे दान देणार असल्याचे मत प्रणय भुईभार यांनी व्यक्त केले. वंशपरंपरेला फाटा देऊन सुशिक्षित तरुणांना निवडून देण्याचे मत यावेळी प्रवाशांनी व्यक्त केले. संजीवनी सांगळे यांनी यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांबाबत मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी भावना गवळी यांच्या कामावर समाधानी असल्याचे सांगितले. पाच वर्षानंतर हा उत्सव, मोठा पर्व आहे. मजबूत सरकार देण्यासाठी मतदानासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचा सूरही यावेळी उमटला. भंते विजय किर्ते यांनी एसटी बसच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली. जगन मोरे यांनी चीन व पाकिस्तानच्या धोरणांवर सडकून टीका केली. या दोन्ही देशांना धडा शिकवण्यासाठी मोदींची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्या!देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असली, तरी आजपर्यंत केंद्र अथवा राज्यातील कोण्याही पक्षाच्या सरकारने ठोस धोरण आखले नसल्याचे मत पातूर येथील संदीप उगले यांनी व्यक्त केले. शेतमालाला हमीभाव देणारी यंत्रणा उभारण्याची गरज असून, सिंचनाची शस्रविधा, विद्यस्रत पुरवठा तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी कठोर नियम करणारे सरकार हवे,अशी भावना उगले यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक