शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’शी मोबाइल क्रमांक ‘लिंक’साठी विद्यार्थ्यांना हेलपाटे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:19 IST

अकोला : शिष्यवृत्तीचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांक मोबाइल क्रमांकाशी संलग्नित (लिंक ) करण्यासाठी सेतू केंद्रांकडून विद्यार्थी-पालकांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत. त्यामुळे यासंदर्भात सोमवारी विद्यार्थी व पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. 

ठळक मुद्देविद्यार्थी-पालकांनी घेतली जिल्हाधिकारी कार्यालयात धाव

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिष्यवृत्तीचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांक मोबाइल क्रमांकाशी संलग्नित (लिंक ) करण्यासाठी सेतू केंद्रांकडून विद्यार्थी-पालकांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत. त्यामुळे यासंदर्भात सोमवारी विद्यार्थी व पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. सावित्रीबाई फुले शिष्यवृती योजना, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शासनामार्फत विद्यार्थ्यांना  शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचा  आधार क्रमांक मोबाइल क्रमांकाशी संलग्नित असणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने अकोला शहरासह जिल्ह्यात सेतू केंद्रांवर आधार क्रमांकासोबत मोबाइल क्रमांक ‘लिंक ’ करण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी होत आहे; मात्र आधार क्रमांकाशी मोबाइल क्रमांक ‘लिंक’ करण्यासाठी सेतू केंद्रांकडून विद्यार्थी-पालकांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येत आहे. तर ‘आधार’शी मोबाइल क्रमांक ‘लिंक’साठी सेतू केंद्रांकडे जाण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सांगितले जात आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरणार्‍या विद्यार्थ्यांना आधार क्रमांकाशी मोबाइल क्रमांक लिंक करण्यासाठी नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत. त्यामुळे या प्रश्नावर काही विद्यार्थी -पालकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन विचारणा केली.

शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता आधार क्रमांकाशी मोबाइल क्रमांक ‘लिंक’ असणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘आधार’शी मोबाइल क्रमांक ‘लिंक’ करण्याकरिता सेतू केंद्रांवर गेल्यास, त्यांच्याकडून टाळाटाळ केली जात असून, जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचे सांगितले जात आहे.-विनोद रामराव ठाकरेविद्यार्थिनीचे पालक, अकोला.

शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांकासोबत मोबाइल क्रमांक ‘लिंक’ करण्याकरिता विद्यार्थी-पालकांची गैरसोय होणार नाही, यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहे.- संजय खडसे उपविभागीय अधिकारी, अकोला.