अकोला: घरात घुसून अज्ञात चोरट्याने ९ हजार रुपये किंमतीचा मोबाईल लंपास केल्याची घटना २७ मे रोजी दुपारी ३.३0 वाजतादरम्यान घडली. या प्रकरणी गुरुवारी सिव्हिल लाईन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रतनलाल प्लॉटमध्ये राहणारे प्रफुल्ल सुधाकर सोनोने (२५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी दुपारी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरामध्ये घुसून ९ हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला.
घरातून मोबाईल लंपास
By admin | Updated: May 29, 2014 23:22 IST