शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विमा काढण्याच्या नावाखाली मोबाइलधारकांची फसवणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2017 01:56 IST

अ‍ॅप डेली कंपनीने कार्यालय केले बंद: पैसे घेऊन एजंट पसार; न्यायालयाकडे तक्रार

अकोला: मोबाइल खरेदी केल्यानंतर त्याचा विमा काढण्याच्या नावाखाली मुंबईच्या अ‍ॅप डेली कंपनीने जिल्ह्यातील शेकडो मोबाइलधारकांची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, अ‍ॅप डेली नावाच्या नावाखाली वर्षभरातच अकोल्यातील कार्यालय गुंडाळून पोबारासुद्धा केला. यासंदर्भात पंचशील नगरात राहणारे श्यामसुंदर गुप्ता यांनी अ‍ॅप डेली कंपनीच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.दररोज शेकडो व्यक्ती बाजारातून विविध कंपन्यांचे मोबाइल विकत घेतात. मोबाइल विक्री करणाऱ्या प्रतिष्ठानांमध्ये विमा कंपन्याचे एजंट कार्यरत असतात. मोबाइल घेतल्यावर हजार, पंधराशे रुपयांचा विमा काढून ग्राहकाला मोबाइलची तुटफूट झाल्यास, तांत्रिक बिघाड किंवा चोरी झाल्यास, दहा दिवसांच्या आता मोबाइल बदलून मिळेल किंवा दुरुस्ती करून मिळेल, असे आमिष दाखवितात आणि मोबाइल पूर्णत: निकामी झाल्यास मोबाइलची पूर्ण किंमत, दुरुस्तीचा खर्च देण्याचेही आमिष दाखवितात. विमा एजंटांच्या भुलथापांना बळी पडून अनेक जण मोबाइलचा विमा काढतात. असाच प्रकार पंचशील नगरात राहणारे श्यामसुंदर गुप्ता यांच्यासह अनेक ग्राहकांसोबत घडला. गुप्ता यांनी ११ हजार रुपये किमतीचा मोबाइल खरेदी केल्यानंतर तेथील एका एजंटकडून १,२४५ रुपयांचा विमा काढला. यावेळी एजंटने त्यांचे कार्यालय जैन मंदिराजवळ असल्याचे त्यांना सांगितले आणि काही अडचण आल्यास कार्यालयात संपर्क साधण्यासही सांगितले. दरम्यान, गुप्ता यांचा मोबाइल चोरी झाल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार केली आणि त्यासंबंधीचे कागदपत्र घेऊन अ‍ॅप डेली कंपनीचे कार्यालय गाठले; परंतु त्यांना कार्यालय बंद असल्याचे दिसून आले. त्यांनी चौकशी केल्यानंतर येथील कार्यालय बंद झाल्याचे त्यांना कळले. याठिकाणी आणखी मोबाइलधारकसुद्धा आलेले होते. त्यांचीही फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यामुळे गुप्ता यांच्यासह आणखी काही मोबाइलधारकांनी अ‍ॅड. शेषराव गव्हाळे यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल केली आहे. अ‍ॅप डेली विमा कंपनीने गुप्ता यांचीच नाहीतर शेकडो ग्राहकांची लाखो रुपयांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे या कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. उदंड झाल्या विमा कंपन्यामोबाइल क्षेत्रातही शेकडो विमा कंपन्या निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक मोबाइल शोरूममध्ये या विमा कंपन्यांचे एजंट बसलेले असतात. शोरूम मालकसुद्धा ग्राहकांना मोबाइलचा विमा काढण्यासाठी प्रोत्साहित करतात. ग्राहकाने सहमती दर्शविल्यानंतर त्यांना विमा एजंटकडे नेल्या जाते आणि एजंट मोबाइलचा विमा काढून देतो. कंपनीने दिलेले मोबाइल नंबर बंदयासंदर्भात अ‍ॅप डेली कंपनीने दिलेल्या मोबाइल नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मोबाइल बंद असल्याचे दिसन आले.