शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मोबाइल कंपन्यांची १६ किलोमीटर ‘ओव्हरहेड केबल’ खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 11:59 IST

मागील सहा दिवसांत या विभागाने रिलायन्स जिओ,आयडिया-व्होडाफोन आदींसह इंटरनेट सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांचे १६ किलोमीटर अनधिकृत केबल जप्त केले.

अकोला : महापालिकेची दिशाभूल तसेच फसवणूक करीत मोबाइल कंपन्यांनी भूमिगत फायबर आॅप्टिक केबलच नव्हे तर मनपाचे पथखांब, विद्युत खांब तसेच इमारतींवरूनही मोठ्या प्रमाणात ‘ओव्हरहेड केबल’ टाकल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी विद्युत विभागाने पूर्व झोनमधील दामले चौक, जठारपेठ चौक, सातव चौक आदी भागात ‘ओव्हरहेड केबल’ जप्त करण्याची कारवाई केली. मागील सहा दिवसांत या विभागाने रिलायन्स जिओ,आयडिया-व्होडाफोन आदींसह इंटरनेट सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांचे १६ किलोमीटर अनधिकृत केबल जप्त केले.शासनाच्या महानेट प्रकल्प अंतर्गत महापालिक ा क्षेत्रात २६ किलोमीटर अंतरासाठी भूमिगत फायबर आॅप्टिक केबल टाकण्याचे काम स्टरलाइट टेक कंपनीमार्फत केल्या जात असतानाच या कंपनीच्या खोदकामादरम्यान रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीचेही अनधिकृत पाइप व केबल टाकल्या जात असल्याचा गंभीर प्रकार चव्हाट्यावर आला. या प्रकरणाची थेट केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी दखल घेत कारवाई करण्याचे महापालिका प्रशासनाला निर्देश दिले. मोबाइल कंपन्यांनी मनपाच्या परवानगीला ठेंगा दाखवत अनधिकृतपणे भूमिगत केबल टाकल्यामुळे प्रशासनाचे सुमारे ३० ते ३२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. भूमिगत केबलसोबतच कंपन्यांनी चक्क मनपाचे पथखांब, विद्युत खांब तसेच इमारतींवरूनही मोठ्या प्रमाणात अनधिकृत ‘ओव्हरहेड केबल’ टाकल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आयुक्त संजय कापडणीस यांनी संपूर्ण शहरातील ‘ओव्हरहेड केबल’ खंडित करून जप्त करण्याचा आदेश विद्युत विभागाला दिला आहे. त्यानुषंगाने सोमवारी पूर्व झोनमधील जठारपेठ, सातव चौक, दामले चौक आदी भागात केबल जप्तीची कारवाई करण्यात आली.आधी सखोल तपासणी आणि नंतर...मनपा प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची घाईघाईत तपासणी आटोपून मोबाइल कंपन्यांना तीन पट, चार पट दंड आकारणे, सबळ पुरावे नसताना कंपनीच्या संचालकांविरोधात फौजदारी दाखल करण्याच्या उद्देशातून सत्तापक्षाकडून प्रशासनावर दबावतंत्राचा वापर होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची शांतपणे सखोल तपासणी केल्यानंतरच पुढील ठोस कारवाईला सामोरे जाण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती आहे.

मोबाइल कंपन्यांना देणार ‘डिमांड नोटीस’मनपाच्या परवानगीशिवाय अनधिकृत भूमिगत केबल टाकणे, मोबाइल टॉवरची उभारणी करणे तसेच ‘ओव्हरहेड केबल’चे जाळे टाकण्यात आल्याचे समोर आले. याप्रकरणी संबंधित मोबाइल कंपन्यांना महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार ‘डिमांड नोटीस’ देण्याच्या हालचाली नगररचना विभाग, बांधकाम विभाग, मालमत्ता कर वसुली विभाग आणि विद्युत विभागामार्फत सुरू झाल्या आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका