शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मो. इर्शाद हत्याकांडातील सहा आरोपी निर्दोष

By admin | Updated: April 7, 2017 22:58 IST

अकोला : १२ जुलै २०१२ रोजी घडलेल्या मो. इर्शाद मो. अयुब हत्याकांडातील सहा आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली.

जिल्हा न्यायालयाने ठोठावली होती जन्मठेप, उच्च न्यायालयात सुटकाअकोला : हाशम सेठ लायब्ररीजवळ १२ जुलै २०१२ रोजी घडलेल्या मो. इर्शाद मो. अयुब हत्याकांडातील सहा आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली. या हत्याकांडात सहा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती; मात्र उच्च न्यायालयाने या आरोपींची सुटका केली.कागजीपुरा येथील रहिवासी मो. इर्शाद मो. अयुब यांच्यावर मो. मुनाफ मो. हबीब, मो. अन्सार, मो. इरफान, मो. आमीर, मो. आजम आणि मो. हनीफ या सहा जणांनी अवैध सावकारीच्या कारणावरून १२ जुलै २०१२ रोजी रात्री ८ वाजता धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मो. इर्शाद मो. अयुब यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या डोक्यावर मोठा दगड टाकून त्यांचा खून करण्यात आला होता. मो. इर्शाद याच्यासोबतच त्याचा भाऊ मो. एजाज याच्यावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी मो. एजाज यांच्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी सदर सहा जणांसह १२ जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३०७, ३०२ आणि आर्म्स अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा व सत्र न्यायालयाने यामधील सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती; मात्र आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या निर्णयाविरोधात धाव घेतली. नागपूर खंडपीठाने या सहा आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींच्या वतीने उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. अविनाश गुप्ता यांनी कामकाज पाहिले, तर त्यांना अ‍ॅड. आर. के. तिवारी, अ‍ॅड. आकाश गुप्ता आणि अ‍ॅड. आशिष देशमुख यांनी कामकाज पाहिले.विधिज्ञांना धमकीमो. मुनाफ मो. इर्शाद हत्याकांडातील आरोपींचे वकील अ‍ॅड. अविनाश गुप्ता यांनी सदर प्रकरण न्यायालयात चालवू नये म्हणून त्यांना धमकी देण्यात आली होती; मात्र या धमक्यांना बळी न पडता गुप्ता यांनी कामकाज पाहिले. त्यानंतर सदर आरोपी निर्दोष सुटले आहेत.