शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहातील असुविधांबाबत अधीक्षकाला आमदारांनी खडसावले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:35 IST

अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी सोमवारी सकाळी पीएच मार्केटमधील आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहाला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. वसतिगृहातील स्वच्छता, भोजनाचा दर्जा, निवासाची दुरवस्था पाहून संतापलेल्या आमदार सावरकरांनी वसतिगृह अधीक्षकाला चांगलेच खडसावले आणि अधीक्षकाची आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, विभागीय संचालक सरोदे, प्रकल्प विकास अधिकारी वनिता सोनवणे यांच्याकडे तक्रार करून कारवाई करण्यास सांगितले. 

ठळक मुद्देआमदार सावरकर यांची वसतिगृहाला भेट समस्या निकाली काढण्याचे प्रकल्प अधिकार्‍यांचे आश्‍वासन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी सोमवारी सकाळी पीएच मार्केटमधील आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहाला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. वसतिगृहातील स्वच्छता, भोजनाचा दर्जा, निवासाची दुरवस्था पाहून संतापलेल्या आमदार सावरकरांनी वसतिगृह अधीक्षकाला चांगलेच खडसावले आणि अधीक्षकाची आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, विभागीय संचालक सरोदे, प्रकल्प विकास अधिकारी वनिता सोनवणे यांच्याकडे तक्रार करून कारवाई करण्यास सांगितले. पीएच मार्केटमधील आदिवासी विद्यार्थी वसतिगृहामधील सुविधा, भोजनाचा दर्जा याबाबत आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने आमदार सावरकर यांनी महापौर विजय अग्रवाल, गिरीश जोशी, डॉ. संजय शर्मा, प्रशांत अवचार, उमेश गुजर यांच्यासोबत आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाला भेट दिली आणि वसतिगृहाची पाहणी केली. पाहणीदरम्यान आमदार सावरकर यांना वसतिगृहामध्ये ठिकठिकाणी अस्वच्छता दिसून आली. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या भोजनाचा दर्जाही निकृष्ट असल्याचे दिसून आले. एवढेच नाही, तर विद्यार्थी राहात असलेल्या वसतिगृहातील खोल्यांची दुरवस्था झाल्याचे दिसून आले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची विदारक परिस्थिती पाहून आमदार रणधीर सावरकर संतप्त झाले आणि त्यांनी वसतिगृह अधीक्षक मदन इंगोले यांना जाब विचारला. अधीक्षक निरूत्तर झाल्यामुळे आमदार सावरकर यांनी थेट आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, आदिवासी विकास प्रकल्प संचालक सरोदे आणि प्रकल्प विकास अधिकारी वनिता सोनवणे यांच्यासोबत संपर्क साधून आदिवासी वसतिगृहातील गैरव्यवस्था त्यांच्या कानावर घातली आणि वसतिगृह अधीक्षक मदन इंगोले यांच्याविरुद्ध कडक कारवाईची मागणी करीत, आदिवासी वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा, भोजन उपलब्ध करून देण्यात यावे आणि शासनाच्या विकास योजनांना काळिमा फासण्याचे काम अधिकारी, कर्मचार्‍यांच्या माध्यमातून होता कामा नये, असे आमदार सावरकर यांनी बजावले. आमदार सावरकरांनी आदिवासी वसतिगृहाला भेट दिल्याचे पाहता, प्रकल्प अधिकारी वनिता सोनवणेसुद्धा वसतिगृहात हजर झाल्या. यावेळी प्रकल्प अधिकारी सोनवणे यांच्याकडे वसतिगृह अधीक्षक मदन इंगोले यांच्या गैरव्यवस्थेचा पाढाच आमदारांनी वाचला. यावेळी प्रकल्प अधिकारी सोनवणे यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या लक्षात घेता, इंगोले यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा पुरविण्यात येतील, असे आश्‍वासन दिले.