शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आमदार निधीचे ४.५ कोटी गेला परत!

By admin | Updated: April 9, 2016 01:40 IST

अखर्चित निधी शासनाकडे सर्मपित : विकासकामे अडकली

संतोष येलकर / अकोलाआमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत सन २0१५-१६ यावर्षी जिल्ह्यातील सात आमदारांना विकासकामांसाठी शासनामार्फत १४ कोटींचा निधी प्राप्त झाला. उपलब्ध निधीपैकी मार्च अखेरपर्यंत ९ कोटी ५६ लाख ७३८ रुपयांचा निधी खर्च झाला. उर्वरित ४ कोटी ४३ लाख ९९ हजार २६२ रुपयांचा अखर्चित निधी ह्यमार्च एन्डह्णला शासनाकडे परत गेला. निधी शासनाकडे सर्मपित झाल्याने या निधीतील विकासकामे लांबणीवर पडणार आहेत.आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांना मतदारसंघात रस्ते, सामाजिक सभागृह, शाळांना संगणक पुरविणे, हातपंप अशी विविध विकासकामे करण्यासाठी शासनामार्फत दरवर्षी प्रत्येकी दोन कोटींचा निधी दिला जातो. त्यानुसार सन २0१५-१६ या वर्षात आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत जिल्ह्यातील सात आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी १४ कोटींचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाकडे उपलब्ध झाला होता. उपलब्ध निधीपैकी ३१ मार्चपर्यंत ९ कोटी ५६ लाख ७३८ रुपयांचा निधी खर्च झाला. उर्वरित ४ कोटी ४३ लाख ९९ हजार २६२ रुपयांचा निधी अखर्चित राहिला. आमदार निधीतील विकासकामांचे उशिरा प्राप्त झालेले प्रस्ताव आणि त्यामुळे कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्यास झालेला विलंब आणि कामांची ई-निविदा प्रक्रिया रेंगाळल्यामुळे सातही आमदारांचा अखर्चित ४ कोटी ४३ लाख ९९ हजार २६२ रुपयांचा निधी ३१ मार्च रोजी (मार्च एन्ड) शासनाकडे सर्मपित करण्यात आला. शासनाकडे परत गेलेला आमदार निधी येत्या डिसेंबर, जानेवारीपर्यंत शासनाकडून परत मिळणार आहे; मात्र तोपर्यंत या निधीतून होणारी विविध विकासकामे लांबणीवर पडणार आहेत. त्यामुळे आमदार निधीतून संबंधित आमदारांनी मतदारसंघात प्रस्तावित केलेल्या विकासकामांना शासनाकडून निधी परत मिळेपर्यंत 'ब्रेक' लागणार आहे.