शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

हजारो शिधापत्रिकाधारकांची नावे गहाळ

By admin | Updated: May 7, 2017 02:44 IST

दुकानदारांकडून शोध सुरू; भारती कॉम्प्युटर्सचा प्रताप.

सदानंद सिरसाटअकोला: शिधापत्रिकांचे संगणकीकरण केल्यानंतर त्यामध्ये आधार कार्ड, मोबाइल क्रमांक जोडण्यासाठी दुकानदारांनी दिलेल्या यादीत भलतीच नावे घुसडण्यात आली आहेत. दुकानदारांकडे पूर्वी असलेल्या नावांचा त्यातून शोध घेऊन यादी पुन्हा तयार करण्याचे काम दुकानदारांनाच सोपवण्यात आल्याने या प्रक्रियेत मोठा गोंधळ माजला आहे. विशेष म्हणजे, जिल्हय़ातील सव्वातीन लाखांपेक्षाही अधिक शिधापत्रिकाधारकांची माहिती अपलोड करण्यासाठी नियुक्त कंत्राटदाराने केलेला घोळ आता दुकानदारांसह अधिकारी, कर्मचार्‍यांना निस्तरण्याची वेळ आली आहे.ऑनलाइन धान्यवाटपाची पूर्वतयारी म्हणून बोगस शिधापत्रिका शोधणे, त्यासोबतच लाभार्थींचे आधारकार्ड, मोबाइल क्रमांक अद्ययावत करण्यासाठी २0१२ पासून दोनवेळा शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्यात आले. मे २0१५ मध्ये आधार कार्ड, मोबाइल क्रमांक अपलोड करण्यासाठी बुलडाणा येथील भारती कॉम्प्युटर्स यांना निविदेतून काम देण्यात आले. कामाचे आदेश देताना जिल्हाधिकार्‍यांसोबत झालेल्या करारनाम्यात काम बिनचूक करण्याची अट आहे. त्या अटीनुसार कामच झाले नसल्याचे स्पष्ट होत आहे.माहिती अपलोड करतानाच गोंधळसंगणकात आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांक जोडण्यासाठी दुकानदारांकडून यादी आणि कागदपत्राचा वापर करणे बंधनकारक होते; मात्र त्यामध्येच कंत्राटदार भारती कॉम्प्युटरने गोंधळ घातला. अकोला शहरातील १२३ दुकानदारांनी दिलेल्या यादीनुसार एकही यादी तयार झाली नाही. दुकानदारांकडे असलेल्या शिधापत्रिकाधारकांची संख्या शंभर ते तीनशेने वाढल्याची यादी त्यांच्या हातात देण्यात आली. तर अनेकांच्या दुकानात जोडलेली शेकडो नावे गहाळ करण्यात आली. हा प्रकार पाहताच पुरवठा विभागाच्या तोंडचे पाणीच पळाले. त्यातच यादीनुसार पॉस मशीनद्वारे वाटप बंधनकारक असल्याने दुकानदारांसह प्रशासन दुहेरी अडचणीत आले.शिधापत्रिकांचे संगणकीकरण झाल्यानंतर फेरपडताळणी करावीच लागणार होती. त्यामुळे ही प्रक्रिया सुरू आहे. याद्यांमध्ये झालेला गोंधळ तांत्रिक कारणांमुळे आहे. तो दूर करण्यासाठी दुकानदारांच्या नावे निघत असलेली यादी त्यांच्याकडूनच पडताळणी केली जात आहे. - रमेश पवार, अन्नधान्य वितरण अधिकारी