शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी पत्रातून शेतक-यांची दिशाभूल

By admin | Updated: October 9, 2016 02:58 IST

पिकांची भरपाई मिळेल की नाही; शेतक-यांमध्ये साशंकता !

अकोला, दि. 0८- पेरणीपासून काढणीपर्यंत व त्या पश्‍चातही पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळेल, अशी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यामुळेच परतीच्या पावसाने उडीद, सोयाबीन पिकांचे नुकसान झालेले शेतकरी विमा कंपनीकडे धाव घेत आहेत; मात्र विमा कंपनीकडून शेतकर्‍यांची मागणी फेटाळणारे इंग्रजी भाषेतील पत्र हातात देऊन दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे आता नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळेल की नाही, हा मुद्दा अधांतरी आहे.ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान पावसात २५ ते ३५ दिवसांचा खंड पडला. त्यानंतर परतीच्या पावसाने काढणीसाठी तयार असलेल्या उडीद व सोयाबीनचे केलेले नुकसान शेतकर्‍यांना जबर फटका देणारे आहे. या पिकांची नुकसान भरपाई मिळावी, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नुकसानासाठी कारणीभूत ठरणार्‍या संकटांपासून संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे कंपनीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार असे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांनी पीक विमा कंपनीच्या ही बाब निदर्शनास आणून द्यावयाची आहे, त्यासाठी गेल्या महिनाभरापासून शेतकरी विमा कंपनीच्या कार्यालयात चकरा मारत आहेत. सद्यस्थितीत आकोट, तेल्हारा तालुक्यातील उडीद पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी विमा कंपनीकडे धाव घेत आहेत; मात्र विमा कंपनी अर्जदार शेतकर्‍यांच्या हातात इंग्रजी भाषेतील पत्र देत आहे. त्यामध्ये ऑक्टोबरमध्ये पडणारा पाऊस अवकाळी नाही. तसेच पडलेला पाऊस नुकसान करण्याएवढा नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची मागणी जागेवरच फेटाळण्याचा सोपा मार्ग कंपनीने इंग्रजी भाषेच्या माध्यमातून शोधलेला आहे. त्यातून शेतकर्‍यांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे वाया गेलेल्या उडीद पिकाला विमा कंपनीची मदत मिळण्यासाठी काय करावे, कोणाला भेटावे, या विवंचनेत जिल्हय़ातील शेतकरी आहेत. शेतीनिहाय नुकसानाच्या पाहणीला बगलनव्या स्वरुपातील पीक विमा योजना सुरू करताना त्यामध्ये विम्याचा दावा देण्याचे नियम करण्यात आले आहेत. नव्या योजनेत स्थानिक आपत्ती म्हणून गारपीट, भुस्खलन, पूर, जलमय होणे, या स्थितीमध्ये शेतनिहाय नुकसानीची पाहणी केल्या जाणार आहे. त्याचप्रमाणे पीक कापणीनंतर शेतात १४ दिवसांच्या आत चक्रीवादळ अथवा अवकाळी पाऊस आल्यास नुकसानाची शेतनिहाय पाहणी करून नुकसानाचा दावा मंजूर केला जातो; मात्र या तरतुदीनुसार पाहणी करण्याला विमा कंपनीच्या अधिकार्‍यांकडून बगल दिली जात आहे. त्यातून शेतकर्‍यांची फसवणूकही केली जात आहे.