शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

२५ टक्के प्रवेश प्रक्रियेतून वाचण्यासाठी शाळा बनल्या अल्पसंख्याक!

By admin | Updated: April 2, 2016 01:07 IST

शासनाच्या निर्णयाला बगल देण्याचा प्रयत्न.

अकोला: शिक्षण हक्क कायद्यानुसार शासनाने इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहरातील काही शाळांनी २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबवून गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचे इंग्रजी शाळांमध्ये शिकण्याचे स्वप्न पूर्ण केले. परंतु शहरातील काही शाळा शासनाच्या निर्णयाला बगल देण्याचा प्रयत्न करीत आहेत. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेतून वाचण्यासाठी या काही इंग्रजी शाळांनी अल्पसंख्याक असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त केले आहेत. अल्पसंख्याक शाळेचा दर्जा मिळालेल्या शाळेमध्ये २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यापासून सूट मिळते. त्यामुळे शहरातील काही शाळा शिक्षण मंत्रालयात जाऊन आर्थिक देवाण-घेवाण करून अल्पसंख्याक शाळेचे प्रमाणपत्र आणत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिक्षण हक्क कायद्यानुसार इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍या पालकांच्या पाल्यांना इयत्ता पहिल्या वर्गामध्ये प्रवेश द्यावा. त्यासाठी कोणतेही शिक्षण शुल्क आणि डोनेशन शुल्क न घेता हा प्रवेश द्यावा लागतो. शासनाने प्रवेश दिलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क शाळांना देण्याची तरतूद आहे. नेमकी हीच बाब शहरातील काही शाळांच्या जिव्हारी लागली आहे. परंतु शहरातील अशा काही शाळा आहेत, ज्यांनी २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबवूनही शासनाने त्यांना चार वर्षांपासूनचा शिक्षण शुल्काचा परतावा दिलेला नाही. असे असतानाही या शाळांनी गोरगरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. परंतु शासनाने आमच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांना शिक्षण शुल्क परतावा द्यावा, तर येत्या शैक्षणिक वर्षात गोरगरीब विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या शाळेत प्रवेश देऊ, अशी भूमिका घेतली आहे. परंतु काही इंग्रजी शाळांनी मात्र २५ टक्के प्रवेश प्रक्रियेपासून पळ काढण्यासाठी नवीन शक्कल शोधून काढली आहे. या शाळांनी थेट शिक्षण मंत्रालयातून अल्पसंख्याक शाळा असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करून २५ टक्के शाळा प्रवेशास खो दिला आहे. याबाबत अनेक पालकांनी माहितीच्या अधिकारात सुद्धा ही माहिती शिक्षणाकडून मागविली आहे.