शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिज घोटाळ्याचे होणार ‘उत्खनन’!

By admin | Updated: June 1, 2015 02:42 IST

मूर्तिजापूर तालुक्यातील कोट्यवधी रुपयांच्या गौण खनिज घोटाळ्याची प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा चौकशी होणार.

गणेश मापारी / मूर्तिजापूर : तालुक्यातील कोट्यवधी रुपयांच्या गौण खनिज घोटाळ्याची प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा चौकशी होणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. पाटबंधारे विभागाच्या तांत्रिक अधिकार्‍यांकडून मोजमाप करण्यात येणार असून, याबाबतचे पत्र जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाकडून तहसील कार्यालयाला पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे ई-क्लास जमिनीतील गौण खनिजाचे अवैध उत्खनन करून कोट्यवधी रुपये लाटणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील अनभोरा येथील गट क्रमांक २९५, २८0 व २४८ या ई-क्लास जमिनीवरील नाल्यांमधून गौण खनिजाचे अवैध उत्खनन करण्यात आले. याबाबत ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाकडे तक्रारीही सादर केल्या होत्या. अवैध उत्खननामुळे शासनाचा महसूल बुडत असून, ग्रामस्थही त्रस्त झाले होते. त्यामुळे ग्रामस्थ कारवाई होण्यासाठी आग्रही होते. मात्र कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी उपोषणही केले होते. ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाची महसूल प्रशासनाला दखल घ्यावी लागली. परिणामस्वरूप अवैध उत्खननाची चौकशी करण्यात आली. मात्र, चौकशीनंतरही ठोस कारवाई झाली नाही. चौकशीत एकूण खोदकामापैकी जुने खोदकाम किती, ही बाब स्पष्ट होऊ शकत नाही, हे कारण पुढे करीत तहसील कार्यालयाने जिल्हा खनिकर्म अधिकार्‍यांकडून मार्गदर्शन मागितले. आता लवकरच खोदकामाचे मोजमाप होणार असून, चौकशीतून नेमका किती महसूल बुडाला आणि घोटाळ्यातील लाभार्थी कोण आहेत, हे स्पष्ट होईल. याबाबत प्रयत्न करूनही तहसीलदार मालठाणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.