शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्म सिंचन योजनेच्या अनुदानापासून शेतकरी वंचितच!

By admin | Updated: February 8, 2016 02:39 IST

विदर्भावर सातत्याने अन्याय; शेतक-यांची नाराजी.

अकोला: सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत विदर्भातील शेतकर्‍यांनी कर्ज काढून सूक्ष्म सिंचनाचे संच खरेदी केले आहेत; परंतु संच खरेदी करण्यासाठीची पूर्वसंमती घेतली नसल्याची सबब समोर करीत शासनाने मागील दोन वर्षातील पावणेदोनशे कोटी रुपये अनुदान दिले नसल्याने शेतकर्‍यांचा शासनाप्रती प्रचंड नाराजीचा सूर आहे. शेतकर्‍यांनी सूक्ष्म सिंचन अर्थात ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा वापर करण्यासाठी केंद्र शासनाने सूक्ष्म सिंचन योजना सुरू केली आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून शेतकर्‍यांना अनुदान दिले जात आहे; पण २0१२-१३ पासून या योजनेची विभागणी करण्यात आली असून, विदर्भ सिंचन विकास प्रकल्प (व्हीआयआयडीपी) व उर्वरित राज्यासाठी राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन चळवळ (एनएमएमआय) या नावाने ही योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत २0१३-१४ मध्ये विदर्भाला काही अनुदान मिळाले; पण त्यातील ३२९३.८२ लाख रुपये अनुदान अद्याप शेतकर्‍यांना मिळाले नसून, २0१४-१५ मागील वर्षीचे १७७५१.७0 लाख रुपये शासनाकडे थकले आहेत. दरम्यान, २0१४-१५ या वर्षातील अमरावती जिल्हय़ाचे २२ कोटी २३ लाख ३७ हजार रुपये अनुदान रखडले असून, अकोला ८९१.३३ लाख, वाशिम १४९९.00 लाख, बुलडाणा ५५१४.00 लाख (२0१३-१४ चे ३२८0.00 लाख), वर्धा ४२६.00 लाख (२0१३-१४ चे १३.८२ लाख), नागपूर १३८.00 लाख व चंद्रपूर जिल्हय़ातील सूक्ष्म सिंचन साहित्याचे १00.00 लाख रुपये शासनाकडे थकले आहेत. योजना सुरू झाली तेव्हा शेतकरी संच खरेदी करायचे. या संचाची रक्कम कंपनीच्या नावाने निघायची. त्यानंतर शासन अनुदान देईल, असा प्रघात आहे. त्यानुसार शेतकर्‍यांनी मागील तीन वर्षात सूक्ष्म सिंचनासाठी लागणारे पाइप, तुषार, ठिबक व इतर साहित्य खरेदी केले आहे; परंतु शासनाने नवे परिपत्रक काढून संच खरेदी करणार्‍या शेतकर्‍यांना पूर्वसंमतीची अट घातल्याने शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे.