शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
4
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
7
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
8
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
9
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
10
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
11
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
12
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
13
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
14
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
15
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
16
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
17
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
18
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
19
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
20
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती

मिनी ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले

By admin | Updated: May 10, 2014 20:24 IST

मिनी ट्रकने दिलेल्या धडकेमुळे दुचाकीवरील एक जण जागीच ठार

बोरगाव मंजू : भरधाव मिनी ट्रकने दिलेल्या धडकेमुळे दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर वाशिंबा बसथांब्यानजीक शनिवार, १० मे रोजी दुपारी २.३० वाजता घडली. सचितानंद रामदास दोनतकर (३०), असे ठार झालेल्या तरुणाचे नाव असून, अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर येथील धारकडचा रहिवासी असल्याचे कळले आहे.अमरावती जिल्ह्यातील धारकड येथील सचितानंद रामदास दोनतकर आणि त्याचा मित्र हे दोघे दुपारी २.३०च्या सुमारास एमएच-२७, एएम २१७४ क्रमांकाच्या दुचाकीने अकोलाकडून बोरगाव मंजूकडे येत होते. त्याचवेळी एक मालवाहू मिनी ट्रक भरधाव बोरगावकडे येत होता. या मिनी ट्रक च्या चालकाने वाशिंबा बसथांब्यानजीक चुकीच्या बाजूने वाहन नेत दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात सचितानंद दोनतकर जागीच ठार झाला. त्याच्या सोबतच्या मित्राला कसलीच इजा झाली नाही; परंतु अपघात घडल्यानंतर घाबरून तो घटनास्थळावरून पसार झाला. दुचाकीला धडक देणार्‍या मिनी ट्रकसह चलकही फरार झाला. या अपघाताची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिस स्टेशनचे ठाणेदार डी. के. आव्हाळे, हेकाँ. अरुण गावंडे, प्रकाश जुनगडे, शशिकांत पाटील, दंदी, धाडे, राठोड आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा क रीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. फरार मिनी ट्रकचालकाचा पोलिस शोध घेत आहेत. (वार्ताहर)