शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील चिमुकल्यांना मायेची ऊब..!

By admin | Updated: December 19, 2014 01:03 IST

वाशिमकरांनी पाठविले ऊबदार कपडे.

वाशिम : कडाक्याच्या थंडीने गारठत असलेल्या मेळघाटातील तारुबांदा येथील आदिवासी कुटुंबांतील ५00 चिमुकल्यांना वाशिमच्या सद्गृहस्थांनी स्वेटर व ऊबदार कपड्यांच्या माध्यमातून मायेची ऊब दिली आहे.गत तीन-चार दिवसांपासून वातावरणात गारठा अधिकच वाढला आहे. परिणामी थंडीपासून संरक्षण म्हणून स्वेटर, र्जकिन, हातमोजे, कानटोपी आदी गरम व ऊबदार कपड्यांचा सर्व जण आधार घेत आहेत. अशावेळी मेळघाटातील तारुबांदा या ३00 लोकवस्तीच्या खेड्यातील गोरगरीब चिमुकल्यांना ऊबदार कपड्यांविना थंडीतच कुडकुडत राहावे लागत असल्याची बाब वाशिम येथील समाजसेवकांना माहीत झाली. क्षणाचाही विलंब न लावता शांतीनिकेतन इंग्लिश स्कूलचे संस्थापक मुकेश चरखा, स्वर्गीय डॉ. के. व्ही. जिरोणकर स्मृती संस्थेचे डॉ. सुधाकर जिरोणकर, वाशिमचे जिल्हा कोषागार अधिकारी प्रकाश राठोड, धनुर्विद्या संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक अनिल थडकर, सामाजिक कार्यकर्ते राजू बजाज आदींनी जवळपास ५00 स्वेटरची स्वखर्चातून व्यवस्था केली. या सर्वांनी मेळघाटातील तारुबांदा गाव गाठले. गावात चारचाकी गाडी येताच सर्व जण कुतूहलाने गाडीभोवती येऊ लागले. कुणीतरी ह्यसाहेबह्ण आले, असा संदेश संपूर्ण गावभर पसरला. साहेब कशासाठी आले, याची कुजबुज सुरू झाली. गावातील शाळेजवळ सर्वांना बोलाविण्यात आले आणि गाडीमधील चिमुकल्यांसाठी आणलेले स्वेटर बाहेर काढले. चिमुकल्यांसोबत हितगूज साधत ५00 स्वेटरचे वितरण करण्यात आले. मेळघाटातील चिमुकल्यांना स्वेटरचे वितरण करून वाशिमकरांनी आदर्श पायंडा पाडला आहे. वाशिमकरांच्या या उपक्रमातून इतरांनी प्रेरणा घेतल्यास मेळघाटातील इतर ठिकाणच्या चिमुकल्यांही ऊबदार कपड्याच्या माध्यमातून मायेची ऊब मिळू शकेल.