शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

दूध उत्पादक संस्था संघाची निवडणूक अविरोध !

By admin | Updated: June 1, 2015 02:31 IST

आता लक्ष अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडणुकीकडे.

अकोला : जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्था संघाची निवडणूक अखेर अविरोध झाली असून, शुक्रवारी आठ उमेदवारांच्या विजयाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी केली. ही निवडणूक चुरशीची होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु दूध क्षेत्रात राजकारण नको, याकरिता सहकार क्षेत्रातील दिग्गजांनी पुढाकार घेतल्याने ही निवडणूक अविरोध झाली. आता सर्वांचे लक्ष अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीकडे लागले आहे. येत्या ७ जून रोजी होणार्‍या जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्था संघाच्या निवडणुकीत २0 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननीत पाच अर्ज बाद झाल्याने रिंगणात १५ उमेदवार होते. परंतु सहकार क्षेत्रातील दिग्गजांनी ही निवडणूक अविरोध व्हावी, यासाठीचे प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, आठ उमेदवार अविरोध घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये अकोला तालुका सर्वसाधारण मतदारसंघातून ज्योत्स्नना चोरे, आकोट तालुका सर्वसाधारण मतदारसंघातून रमेश भिसे, सर्वसाधारण तेल्हारा तालुका मतदारसंघातून संजय इंगळे, सर्वसाधारण मूर्तिजापूर मतदारसंघातून प्रशांत हजारी, महिला राखीव जिल्हा मतदारसंघातून वंदना आगे, महिला राखीवमधूनच नलिनी लटकुटे, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून जाकीर उल्लाखाँ पटेल साबीर उल्लखा पटेल तर डीटीएनटी अगर विशेष मागासप्रवर्गातून अहेमद शहा कादीर शहा यांचा समावेश आहे. ही निवडणूक अविरोध होण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे, अनिल पाचडे, हिदायत पटेल, रमेश बोंद्रे, शंकरराव चौधरी यांनी पुढाकार घेतला.