शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सपोर्टनगरातील पाच भूखंडावर एमआयडीसीची जप्तीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:51 IST

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : उद्योग उभारणीसाठी पाच वर्षांपासून भूखंडाचा ताबा घेऊन बसलेल्या आणि कोणताही उद्योग सुरू न करणार्‍या ट्रान्सपोर्टनगरातील पाच उद्योजकांकडून स्थानिक औद्योगिक वसाहत विकास महामंडळाकडून जप्तीची कारवाई सुरू झाली आहे. या पाचही उद्योजकांना वारंवार नोटीस बजावूनही काहीएक फरक न पडल्याने आता, पंचनामा करून भूखंड जप्त करण्याची प्रक्रिया ...

ठळक मुद्देऔद्योगिक वसाहत विकास महामंडळाकडून जप्तीची कारवाई उद्योग उभारणीसाठी पाच वर्षांपासून भूखंडाचा ताबा

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : उद्योग उभारणीसाठी पाच वर्षांपासून भूखंडाचा ताबा घेऊन बसलेल्या आणि कोणताही उद्योग सुरू न करणार्‍या ट्रान्सपोर्टनगरातील पाच उद्योजकांकडून स्थानिक औद्योगिक वसाहत विकास महामंडळाकडून जप्तीची कारवाई सुरू झाली आहे. या पाचही उद्योजकांना वारंवार नोटीस बजावूनही काहीएक फरक न पडल्याने आता, पंचनामा करून भूखंड जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.महानगरातील अपघात कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी मिळून एमआयडीसीत ट्रान्सपोर्टनगर वसविण्यात आले. मात्र, काही तथाकथित उद्योजकांनी केवळ भूखंड लाटण्यासाठी रकमा भरून ताबा मिळविला. मात्र, कोणताही उद्योग सुरू केला नाही. केवळ ट्रान्सपोर्टनगरच नव्हे, तर एमआयडीसीच्या विविध भागातील भूखंड रिकामे पडून आहेत. एकीकडे उद्योगासाठी शेकडोंची प्रतीक्षा यादी तयार आहे, तर दुसरीकडे ज्यांना भूखंड मिळाले त्यांनी काहीएक उद्योग सुरू केले नाहीत. त्यामुळे राज्य शासनाच्या नियमानुसार भूखंड जप्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पंचनामा करून भूखंड जप्तीची प्रक्रिया झालेल्या उद्योजकांमध्ये पाच जणांचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यातील मूर्तिजापूर-२, पातूर-१ आणि अकोट येथेही अशा प्रकारच्या भूखंड जप्तीच्या कारवाया सुरू झाल्या आहेत. 

 या पाच भूखंडावर जप्तीची कारवाईप्लॉट क्र. २६४ -अब्दुल कदीर अब्दुल हमीद १00 चौरस मीटर, प्लॉट क्र.२६२ -सुनील नीळकंठ देशमुख २00 चौरस मीटर, प्लॉट क्र.१३७- सलिमोद्दीन रहिमोद्दीन २३७.७२ चौरस मीटर, प्लॉट क्र.२६७ मिर्झा सालार बेग मिर्झा १00 चौरस मीटर, प्लॉट क्र. २६१- नईम खान फईम खान १00 चौरस मीटर यांचा या कारवाईत समावेश आहे.

ज्या उद्योजकांनी गेल्या पाच वर्षांपासूून भूखंड ताब्यात घेतले. त्यांना उद्योग सुरु करण्यासंदर्भात अनेकदा नोटीस पाठविल्या आहेत. त्या नोटीसला प्रतिसाद मिळाला नसल्याने आता भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.- सी.एस. डोईजड, क्षेत्र व्यवस्थापक, एमआयडीसी, अकोला.

ट्रान्सपोर्ट नगरात ज्यांना भूखंड देण्यात आलेत, त्यातील ८0 टक्के ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी संबंधित नाहीत. मात्र, ऑनलाइन प्रक्रियेत त्यांनी भूखंड मिळविलेत. भूखंड घेऊन अधिक किमतीत विक्री करणे हा अनेकांचा व्यवसाय झाला आहे. जर उद्योग सुरू होत नसतील तर त्यांचे भूखंड ताब्यात घेतलेच पाहिजे, एमआयडीसीने सुरू केलेली कारवाई योग्य आहे.- जावेद खान, ट्रान्सपोर्ट असोसिएशन पदाधिकारी, अकोला.