शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर एमआयडीसी पोलीस ठाणे कार्यान्वित!

By admin | Updated: January 15, 2016 01:55 IST

गृह राज्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन.

अकोला: जिल्हय़ात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे ठाणे असलेल्या सिव्हिल लाइनचे विभाजन करून नवीन एमआयडीसी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. शुक्रवारी पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. वर्षभरापूर्वी मंजूर झालेल्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या निर्मितीचा मुहूर्त अखेर सापडला. सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवे एमआयडीसी पोलीस ठाणे निर्माण करण्याच्या प्रस्तावाला वर्षभरापूर्वीच शासनाच्या गृह विभागाकडून मंजुरी मिळाली. पोलीस ठाण्यासाठी एमआयडीसीमध्ये दोन हजार चौरस फूट जागासुद्धा उपलब्ध करून देण्यात आली. परंतु, ही जागा पोलीस ठाण्यासाठी सोयीची नसल्याचे कारण देत, पोलीस विभागाने शिवणी विमानतळासमोरील जागेची मागणी औद्योगिक विकास महामंडळाचे क्षेत्रीय अधिकार्‍यांकडे केली होती. परंतु, तूर्तास एमआयडीसीतील पोलीस चौकीच्या इमारतीमध्येच नव्या ठाण्याचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. नवीन ठाण्याच्या प्रभारी ठाणेदारपदी साहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांची नियुक्ती करण्यात आली. ठाण्यामध्ये पोलीस कर्मचार्‍यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजता पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते व खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण, पोलीस निरीक्षक घनश्याम पाटील उपस्थित राहणार आहेत.