शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीचे आरओ कार्यालय द्या ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:53 IST

अकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे  विभागीय प्रादेशिक कार्यालय अकोल्यातच असले पाहिजे,  अशी मागणी अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी  यांची आहे. राजकीय पाठबळ मिळाल्यास ही मागणी पूर्णत्वास  जाऊ शकते, असा दावाही पदाधिकार्‍यांनी केला आहे.

ठळक मुद्देअकोला इंडस्ट्रीज असोसिएशनची मागणी राजकीय पाठबळ हवे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे  विभागीय प्रादेशिक कार्यालय अकोल्यातच असले पाहिजे,  अशी मागणी अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी  यांची आहे. राजकीय पाठबळ मिळाल्यास ही मागणी पूर्णत्वास  जाऊ शकते, असा दावाही पदाधिकार्‍यांनी केला आहे.महाराष्ट्रातील ३४  जिल्हय़ांत मोजून १६ आरओ कार्यालय  आहेत; मात्र विदर्भातील ११ जिल्हय़ांसाठी यातील दोन  विभागीय कार्यालये अमरावती व नागपुर येथे आहेत. उद्योग  व्यावसायात विदर्भात दुसर्‍या क्रमांकाचा जिल्हा म्हणून  अकोल्याची गणना होते; मात्र अकोला, बुलडाणा, वाशिमच्या  उद्योजकाला जर उद्योग टाकायचा असेल तर त्याला, अमरावती,  नागपूर, मुंबईच्या वार्‍या कराव्या लागतात. विविध परवानगीची  प्रक्रिया साधीसोपी व्हावी, यासाठी शासनाने अमरावतीचे  प्रादेशिक कार्यालय अकोल्यात द्यावे, त्यामुळे वाशिम आणि  बुलडाणाच्या उद्योजकांना त्याचा लाभ घेता येईल. ही मागणी  गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने केली जात आहे. पालकमंत्री डॉ.  रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे आणि विभागाचे मंत्री यांनी  वारंवार आश्‍वासने दिलीत; मात्र अद्याप त्याची पूर्तता झालेली  नाही. राजकीय पाठबळ मिळाले, तर ही मागणी पूर्ण होणे अश क्य नाही, असा दावाही पदाधिकार्‍यांनी केला आहे. राज्यातील  काही ठिकाणी दोन जिल्हय़ांसाठी विभागीय कार्यालय दिले  असताना विदर्भवासीयांची मागणी रास्त आहे. असेही इंडस्ट्रीज  असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांचे मत आहे. महाराष्ट्र राज्याचे  औद्योगिक विकास महामंडळाचे सचिव आणि आयुक्त डॉ.  हर्षदीप कांबळे यांच्याकडे अकोल्यातील उद्योजकांचे एक  शिष्टमंडळ जाणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

अकोल्यातील उद्योजकांनी आपल्या मेहनतीवर मुंबईपर्यंत आ पली कीर्ती पोहोचविली आहे. अकोल्यातील उद्योजकांचे अनेक  उत्पादन देशाच्या कानाकोपर्‍यात जातात. विदर्भात अकोल्याचे  नावलौकिक आहे. ही लौकिकता अधिक बळकट करण्यासाठी  एमआयडीसीचे विभागीय कार्यालय अकोल्यात देणे गरजेचे  आहे. उद्योगाला अधिक उभारी मिळेल.-कैलास खंडेलवाल, अध्यक्ष, इंडस्ट्रीज असोसिएशन अकोला.-