शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मतदान प्रक्रियेवर राहणार सूक्ष्म निरीक्षकांचा ‘वॉच’!

By admin | Updated: January 29, 2017 02:41 IST

पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी पाच जिल्ह्यात २८0 सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक

संतोष येलकरअकोला, दि. २८- अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विभागातील पाचही जिल्ह्यात ३ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी मतदारसंघातील पाचही जिल्ह्यातील मतदान केंद्रावर २८0 सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, सूक्ष्म निरीक्षकांचे मतदान प्रक्रियेवर विशेष लक्ष (वॉच ) राहणार आहे.अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघात अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्हय़ांचा समावेश आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पाचही जिल्हय़ात २८0 मतदान केंद्रांवर ३ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्हय़ात २८0 मतदान पथके गठित करण्यात आली आहेत, तसेच मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी पाचही जिल्ह्यात प्रत्येक मतदान केंद्रांवर प्रत्येकी एक प्रमाणे सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या आदेशानुसार, विभागातील पाचही जिल्ह्यात २८0 सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया दरम्यान मतदान केंद्रांवरील हालचालींवर सूक्ष्म निरीक्षकांचे विशेष लक्ष राहणार आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी विभागातील पाचही जिल्ह्यात नेमण्यात आलेल्या या सूक्ष्म निरीक्षकांमध्ये केंद्र शासन अंतर्गत डाक विभाग, बँका, भारतीय जीवन विमा व इतर कार्यालयांच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे. मतदार याद्या तहसील कार्यालयांमध्ये !अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यानुषंगाने पदवीधर मतदारांना अनुक्रमांक आणि मतदान केंद्राची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी विभागातील पाचही जिल्ह्यात मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या गत मंगळवारी तहसील कार्यालयांमध्ये लावण्यात आल्या आहेत.