शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांना स्वतःहून पाठविता येणार मीटर रीडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:23 IST

महावितरणकडून केंद्रिकृत वीज बिलप्रणाली (सेंट्रलाइज बिलिंग सिस्टिम) सुरू करण्यात आल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला ...

महावितरणकडून केंद्रिकृत वीज बिलप्रणाली (सेंट्रलाइज बिलिंग सिस्टिम) सुरू करण्यात आल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीज ग्राहकांकडील मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहे. महिन्यामध्ये रीडिंगसाठी निश्चित केलेली तारीख ग्राहकांच्या वीज बिलांवर नमूद आहे. मीटर क्रमांकदेखील नमूद आहे. रीडिंगच्या या निश्चित तारखेच्या एक दिवसआधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वतःहून रीडिंग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे दरमहा विनंती करण्यात येत आहे. हा मेसेज मिळाल्यापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाइल ॲप किंवा वेबसाइटद्वारे रीडिंग पाठविता येईल.

मीटर रीडिंग पाठविण्याची सोपी पद्धत

वीज ग्राहक महावितरण मोबाइल ॲप किंवा महावितरण वेबसाइटवरून स्वत: मीटर रीडिंग पाठवू शकतात.

मोबाइल ॲपद्वारे रीडिंग घेण्यासाठी वीज ग्राहकांनी

महावितरण मोबाइल ॲपमध्ये ‘सबमिट मीटर रीडिंग’वर क्लिक करावे

एकापेक्षा जास्त ग्राहक क्रमांक असल्यास ज्या क्रमांकाचे मीटर रीडिंग पाठवायचे आहे तो क्रमांक सिलेक्ट करावा.

त्यानंतर मीटर क्रमांक नमूद करावा.

मीटर रीडिंग घेताना वीज मीटरच्या स्क्रिनवर तारीख व वेळेनंतर रीडिंगची संख्या व केडब्लूएच (kWh) असे दिसल्यानंतरच फोटो काढावा.

त्यानंतर फोटोनुसार मॅन्युअली रीडिंग ॲपमध्ये नमूद करावे व सबमिट करावे.

मोबाइल ॲपमध्ये लॉगीन केल्यानंतर मीटर रीडिंग थेट सबमिट करता येईल.

मात्र, गेस्ट म्हणून मीटर रीडिंग सबमिट करताना नोंदणीकृत मोबाइलवर प्राप्त झालेला ओटीपी क्रमांक नमूद करावा लागेल.

संकेतस्थळावरून रीडिंग घेण्यासाठी

ज्या ग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाइटवरून फोटो व मीटर रीडिंग अपलोड करायचे आहे. त्यांनी ग्राहक क्रमांकासोबत ग्राहक रजिस्ट्रेशन व लॉगीन करणे आवश्यक आहे.

स्वतःहून मीटर रीडिंग घेण्याचे फायदे अनेक-

प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागणाऱ्या या प्रक्रियेतून लघुदाब वीज ग्राहकांनी दरमहा मीटर रीडिंग व फोटो महावितरणकडे स्वतःहून पाठविल्यास अनेक फायदे होणार आहेत.

स्वतःच्या मीटरकडे व रीडिंगकडे नियमित लक्ष राहील.

वीज वापरावरदेखील नियंत्रण राहील.

रीडिंगनुसार बिल आल्याची खात्री करता येईल.

मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येईल.

वीज बिलांबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत.

रीडिंग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येतील.

शंका समाधानासाठी तक्रार करता येईल.

या व इतर विविध फायद्यांमुळे वीज ग्राहकांनी स्वतःहून दरमहा मीटर रीडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.