शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात मीटर रिडिंगची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 17:45 IST

वीज मीटरचे रिडिंग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

अकोला : महावितरणच्या ग्राहकांना योग्य वीज वापराचे अचूक वीज बिल देण्यासाठी मीटरचे रिडिंग घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोणाच्याही संपर्कात न येता घराबाहेर असलेल्या वीज मीटरचे रिडिंग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.रिडिंग घेणाºया कर्मचाऱ्यांचा रिडिंग घेताना कोणाशीही संपर्क येत नाही. सर्व मीटर ग्राहकांच्या घराबाहेर असल्याने तसेच अपार्टमेंटमध्ये वीज मीटरची तळमजल्यावर स्वतंत्र खोली असल्याने रिडिंगसाठी घरात किंवा इमारतीमध्ये जाण्याची गरज नाही. मीटर रिडिंगची प्रक्रिया महावितरणच्या मोबाइल अ‍ॅपद्वारे होत आहे. मोबाइलद्वारे एका मीटर रिडिंगचा फोटो काढणे व रिडिंग घेणे यासाठी केवळ ८ ते १० सेकंदांचा कालावधी लागतो. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रिडिंग घेण्याचे काम तात्पुरते थांबविण्यात आले होते. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आता जूनमध्ये स्थानिक प्रशासनाची परवानगी मिळालेल्या भागात आणि कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळून मीटर रिडिंग घेण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रिडिंग उपलब्ध होऊ न शकल्याने वीज ग्राहकांना त्यांच्या वीज वापरानुसार सरासरी वीज बिल देण्यात आले. आता जूनमध्ये घेतलेल्या प्रत्यक्ष रिडिंगद्वारे गेल्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीमधील अचूक वीज वापरानुसार वीज बिल दुरुस्त करण्यात येत आहे. तसेच बिलांची रक्कम भरल्यास त्याचे योग्य समायोजन करण्यात येत आहे.ज्या भागातील ग्राहकांच्या वीज मीटरचे रिडिंग घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी मिळाली आहे; मात्र कर्मचाºयांना रिडिंग घेण्यासाठी सोसायटीत प्रवेश नाकारला जात असेल तर तेथील वीज ग्राहकांना पुन्हा सरासरी वीज बिले जाण्याची शक्यता आहे. तसेच अचूक बिलासाठी पुन्हा पुढील महिन्यातील मीटर रिडिंगसाठी प्रतीक्षा करावी लागेल. त्यामुळे मीटर रिडिंग घेणाºया कर्मचाºयांना सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.नियमांचे पालन करण्याच्या सूचनास्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या भागामध्ये आणि कोरोना प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेन्ट एरिया) वगळून वीज ग्राहकांकडील मीटरचे रिडिंग घेण्यात येत आहे. संबंधित एजन्सीजच्या कर्मचाºयांनी मीटर रिडिंग घेताना हॅण्डग्लोव्हज, मास्क, सॅनिटाझर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण