शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

तुटलेल्या रेल्वे रुळाच्या तुकड्याची होणार हवामानशास्त्रीय  चाचणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:18 IST

रेल्वे  रुळांची नियमित चाचणी घेतली जात असतानासुद्धा असा प्रकार घडल्यामुळे स्थानिक रेल्वे अधिकारी संभ्रमात पडले  असून, घडल्या प्रकाराची सखोल चौकशी करण्याच्या  दृष्टिकोनातून तुटलेला रेल्वे रुळाचा भाग हवामानशास्त्रीय  चाचणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात आला आहे. 

ठळक मुद्देनियमित चाचणीनंतरही असा प्रकार घडल्यामुळे अधिकारी  संभ्रमात

राम देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मध्य रेल्वेच्या मूर्तिजापूर सेक्शनमधील यावलखेड- बोरगाव मंजूदरम्यान रविवारी पहाटे तुटलेल्या रेल्वे रुळाने रेल्वे  प्रशासनासमोर एक नवीन आव्हान निर्माण केले आहे. रेल्वे  रुळांची नियमित सूक्ष्म चाचणी घेतली जात असतानासुद्धा असा  प्रकार घडल्यामुळे स्थानिक रेल्वे अधिकारी संभ्रमात पडले  असून, घडल्या प्रकाराची सखोल चौकशी करण्याच्या  दृष्टिकोनातून तुटलेला रेल्वे रुळाचा भाग हवामानशास्त्रीय  चाचणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाच्यावतीने दर दोन महिन्यांनी रेल्वे रुळांची सूक्ष्म  चाचणी घेतली जाते. सर्व शक्यता लक्षात घेऊन करण्यात  येणार्‍या या चाचणीला ‘अल्ट्रासॉनिक टेस्ट’ असे म्हटले जाते.  रेल्वे रुळावर धावणारी ट्रॉली किंवा इन्स्पेक्शन कारच्या  साहाय्याने ही अतिसूक्ष्म चाचणी घेतली जाते. प्रचंड कंपन संख्या  असलेल्या ध्वनिलहरींच्या या चाचणीमध्ये रेल्वे रुळाला  पडलेल्या अत्यंत सूक्ष्म तडादेखील दृष्टीस पडतात व निकृष्ट  झालेले रूळ तत्काळ बदलले जातात. गाड्यांच्या सतत  अवागमनामुळे पडणारा प्रचंड भार आणि वातावरणातील  बदलसुद्धा यासाठी कारणीभूत ठरतो. या सर्व बाबीमुळे कुठलीही  दुर्घटना घडू नये, यासाठी भुसावळ विभागात ही चाचणी नियमित  केली जाते. मूर्तिजापूर सेक्शनमधील रेल्वे रुळांचीसुद्धा ही  चाचणी करण्यात आली होती. असे असतानासुद्धा रविवारी  पहाटे यावलखेड-बोरगाव मंजूदरम्यान डाउन मार्गावर दुरांतो  आणि गरीबरथ गेल्यानंतर तुटलेल्या रेल्वे रुळाने रेल्वे  प्रशासनासमोर आव्हान निर्माण केले आहे. मोठी दुर्घटना टळली  असली, तरी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने  तुटलेला रुळाचा तुकडा हवामानशास्त्रीय चाचणीसाठी मुंबईला  पाठविला असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या विभागीय  अधिकार्‍यांनी ‘लोकमत’ला दिली. त्याचा अहवाल लवकरच  प्राप्त होईल, असेही त्यांनी सांगितले.

ट्रॅकमन काळे यांची रेल्वे बोर्ड अवॉर्डसाठी शिफारसतुटलेल्या रुळाची माहिती दक्षतेने पोहचविणारे ट्रॅकमन किशोर  काशिराम काळे यांना २ हजार रुपयांचा रोख पुरस्कार तसेच  रेल्वे बोर्ड अवॉर्डसाठी शिफारस केली जाणार असल्याची माहि ती भुसावळ विभागाचे डिआरएम आर.के. यादव यांनी लोकम तशी बोलताना दिली. 

दर दोन महिन्यांनंतर रेल्वे रुळांची अल्ट्रासॉनिक टेस्ट केली जा ते. घटनास्थळावरील रेल्वे रुळाचीसुद्धा ती करण्यात आली हो ती. अतिसूक्ष्म पद्धतीने केल्या जाणार्‍या या चाचणीमध्ये निकृष्ट  होणार्‍या रेल्वे रुळाची स्थिती एक ते दीड वर्ष आधीच आम्हाला  कळते. गस्तीवर असलेल्या ट्रॅकमॅन किशोर काळे यांच्या सतर्क तेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. घडल्या प्रकारामुळे  आम्हीसुद्धा संभ्रमात पडलो आहोत.- आर. एस. छाबडा,वरिष्ठ विभागीय अभियंता, मध्य रेल्वे, भुसावळ विभाग.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासी