शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

महेंद्र कल्याणकर यांना निरोप

By admin | Updated: January 22, 2015 02:15 IST

कार्यक्रमावर अकोला मनपा कर्मचा-यांचा बहिष्कार

अकोला: महापालिका आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांची नागपूर येथे बदली झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी खुले नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात त्यांना निरोप देण्यात आला; परंतु थकीत वेतनाची समस्या निकाली काढण्यात आयुक्तांना अपयश आल्याचा आरोप करीत मनपा कर्मचार्‍यांनी कार्यक्रमावर बहिष्कार घातला. मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर ऑक्टोबर महिन्यात प्रशिक्षणासाठी बाहेरगावी होते. डिसेंबर महिन्यात प्रशिक्षण आटोपल्यानंतर ते मनपात पुन्हा कार्यरत होतील, अशी अपेक्षा होती. २0 जानेवारी रोजी अचानक त्यांची नागपूर येथे महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी पदोन्नती झाली. त्यानुषंगाने वरिष्ठ अधिकार्‍यांनी डॉ.कल्याणकर यांना निरोप देण्यासाठी खुले नाट्यगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर डॉ.महेंद्र कल्याणकर, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर, विजय देशमुख, साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, प्रभारी उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाणे, मुख्य लेखा परीक्षक सुरेश सोळसे, विरोधी पक्षनेता साजीद खान, काँग्रेस गटनेता दिलीप देशमुख, माजी उपमहापौर रफिक सिद्दीकी, वैद्यकीय अधिकारी डॉ.फारूख शेख, गौतम गवई, भारिप गटनेता गजानन गवई यांची उपस्थिती होती.

*कर्मचार्‍यांचा बहिष्कार

थकीत वेतनाच्या मुद्यावर प्रशासन चर्चा करण्यास तयार नसताना निरोप समारंभाला मात्र उपस्थित राहण्याचे फर्मान वरिष्ठ अधिकार्‍यांनी सोडले; परंतु थकीत वेतनामुळे कर्मचार्‍यांसह शिक्षकांनी कार्यक्रमावर बहिष्कार घातल्याचे समोर आले. मनपाचे विरोधी पक्षनेता वगळता पदाधिकारी व नगरसेवकांनीदेखील कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.