शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

व्यापार्‍यांच्या तूर खरेदीची तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 03:08 IST

अकोला : जिल्हय़ात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापार्‍यांकडून खरेदी करण्यात आलेल्या तुरीची तपासणी उपविभागीय कृषी अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील समित्यांकडून सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. शेतकर्‍यांकडून खरेदी करण्यात आलेल्या तुरीची विल्हेवाट कोठे लावली, यासंदर्भात या तपासणीत माहिती घेतली जात आहे.

ठळक मुद्देविल्हेवाट कोठे लावलीसमित्यांकडून घेतली जात आहे माहिती

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापार्‍यांकडून खरेदी करण्यात आलेल्या तुरीची तपासणी उपविभागीय कृषी अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील समित्यांकडून सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. शेतकर्‍यांकडून खरेदी करण्यात आलेल्या तुरीची विल्हेवाट कोठे लावली, यासंदर्भात या तपासणीत माहिती घेतली जात आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत काही व्यापार्‍यांकडून खरेदी करण्यात आलेली शेतकर्‍यांची तूर जिल्हय़ातील हमीदराच्या खरेदी केंद्रांवर विकण्यात येत असल्याच्या तक्रारींच्या पृष्ठभूमीवर जिल्हय़ात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापार्‍यांकडून खरेदी करण्यात आलेल्या तुरीची तपासणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिला. त्यानुषंगाने तपासणीसाठी जिल्हय़ातील उपविभागीय कृषी अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील समित्या गठित करण्यात आल्या. उपविभागीय कृषी अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील या समित्यांमध्ये सदस्य म्हणून संबंधित तालुका सहनिबंधक (सहकारी संस्था), पंचायत समितीचे लेखाधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकारी इत्यादींचा समावेश आहे. जिल्हय़ातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापार्‍यांकडून खरेदी करण्यात आलेल्या तुरीची तपासणी या समित्यांकडून ७ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे. व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांकडून खरेदी केलेल्या तुरीची विल्हेवाट कोठे लावण्यात आली, याबाबतची सविस्तर माहिती तपासणीत घेतली जात आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर समित्यांमार्फत लवकरच जिल्हाधिकार्‍यांकडे तपासणीचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. 

‘या’ मुद्यांची घेतली जात आहे माहिती!कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापार्‍यांनी खरेदी केलेली तूर कोणाची आहे?व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांकडून खरेदी केलेल्या तुरीची विल्हेवाट कोठे आणि कशी लावली?व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांकडून खरेदी केलेली तूर पुन्हा शेतकर्‍यांच्या नावावर हमीभावाच्या तूर खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी आणण्यात आली काय, खरेदी केंद्रांवर व्यापार्‍यांकडून तूर खरेदी करण्यात आली काय? इत्यादी मुद्यांची माहिती तपासणीत घेण्यात येत आहे.

७0 व्यापार्‍यांची होणार तपासणी?जिल्हय़ातील प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दहा याप्रमाणे जिल्हय़ातील सातही बाजार समिती अंतर्गत ७0 व्यापार्‍यांकडून करण्यात आलेल्या तूर खरेदीची माहिती या तपासणीत घेण्यात येत आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार जिल्हय़ात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापार्‍यांकडून खरेदी करण्यात आलेल्या शेतकर्‍यांच्या तुरीची विल्हेवाट कोठे लावण्यात आली, यासंदर्भात तपासणी सुरू करण्यात आली आहे.-जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)