शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कॉन्व्हेंट; महिला शिक्षकांसाठी पदभरती

By admin | Updated: July 6, 2017 00:53 IST

अकोला : सर्वसामान्य कुटुंबातील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी महापालिका प्रशासनाने यंदापासून मनपा शाळांमध्ये कॉन्व्हेंट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सर्वसामान्य कुटुंबातील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी महापालिका प्रशासनाने यंदापासून मनपा शाळांमध्ये कॉन्व्हेंट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नर्सरी, केजी-१, केजी-२ यानुसार मनपाच्या ३४ शाळांमध्ये इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमाला सुरुवात केली जाणार असून, शिक्षक पदासाठी ३४ महिलांची पदभरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होताच मनपाच्या शिक्षण विभागात इच्छुक महिलांची गर्दी झाल्याचे चित्र बुधवारी पाहावयास मिळाले. महापालिकेच्या मराठी आणि हिंदी माध्यमाच्या ३४ शाळा असून, मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत दिवसेंदिवस घसरण झाल्याचे चित्र आहे. शिक्षण विभागाच्या भ्रष्ट आणि कुचकामी धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची ऐशीतैशी झाली आहे. शिक्षक संघटनांच्या मनमानीसमोर हतबल ठरलेल्या शिक्षण विभागावर शाळा बंद करण्याची नामुष्की ओढवल्याची परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या कायम ठेवण्यासाठी तसेच गोरगरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणाचा हक्क मिळावा, या उद्देशातून महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मनपाच्या शाळांमध्ये कॉन्व्हेंट सुरू करण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या शालेय सत्रापासून ३४ शाळांमध्ये नर्सरी, केजी-१, केजी-२ चे वर्ग सुरू केल्या जातील. निकषानुसार पात्र ३४ महिला शिक्षक आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी ३४ महिला मदतनीस यांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाने पात्र उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली असून, ७ जुलै अंतिम मुदत देण्यात आली आहे. प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर १० जुलै रोजी इच्छुक उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया पार पडेल. अर्ज दाखल करण्याची मुदत लक्षात घेता इच्छुक महिला उमेदवारांनी अर्ज सादर करण्यासाठी शिक्षण विभागात गर्दी केल्याचे चित्र होते. निवड प्रक्रियेसाठी प्रशासन सज्जचिमुकल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी पात्र महिला उमेदवारांची शिक्षक पदासाठी निवड केली जाईल. शैक्षणिक अर्हतेमध्ये कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. निवड प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती आहे.