शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद पदोन्नती समितीची अखेर बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:40 IST

अकोला : जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील कर्मचाºयांना पदोन्नती देण्यासाठी समितीची बैठक येत्या ११ आॅगस्ट रोजी होत आहे. यावेळी ४४ पदांवर पदोन्नतीसाठी कर्मचाºयांच्या प्रस्तावांवर समिती निर्णय घेणार आहे.

ठळक मुद्देविविध संवर्गातील कर्मचाºयांना मिळणार भेट

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील कर्मचाºयांना पदोन्नती देण्यासाठी समितीची बैठक येत्या ११ आॅगस्ट रोजी होत आहे. यावेळी ४४ पदांवर पदोन्नतीसाठी कर्मचाºयांच्या प्रस्तावांवर समिती निर्णय घेणार आहे. त्याचवेळी जिल्हा परिषदेत पदोन्नतीची दीडशेपेक्षाही पदे रिक्त असल्याची माहिती आहे. त्यामध्ये विविध विभागातील कर्मचाºयांचा समावेश आहे.शासनाने २००१ च्या निर्णयानुसार, अनुशेष पूर्ण करण्यासाठी सरळसेवा आणि पदोन्नतीचे निर्देश दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी २००२ मध्ये त्या निर्णयाप्रमाणे पदोन्नती समिती गठित केलेली आहे. या समितीची बैठक नियमितपणे होऊन कर्मचाºयांना पदोन्नती मिळणे क्रमप्राप्त आहे; मात्र गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषदेतील विविध विभागातील कर्मचाºयांच्या बिंदूनामावलीचा मोठाच घोळ झाला. तो निस्तारून पात्र कर्मचाºयांना पदोन्नती देण्यासाठी निर्दोष बिंदूनामावलीला विभागीय आयुक्तांची मंजुरी घ्यावी लागते. त्यानुसार ज्या विभागाच्या बिंदूनामावलीला अंतिम मंजुरी मिळाली आहे, त्या विभागातील पदोन्नतीसाठी पात्र कर्मचाºयांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पदोन्नती समितीपुढे ठेवले जाणार आहेत. समिती पात्र प्रस्तावांची छाननी करून संबंधितांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेणार आहे. ११ आॅगस्ट रोजीच्या बैठकीत ४४ प्रस्तावांवर निर्णय होण्याची शक्यता आहे.पदोन्नतीची दीडशेपेक्षाही अधिक पदे रिक्तजिल्हा परिषदेतील अराजपत्रित गट-ब, गट-क आणि गट-ड मिळून दीडशेपेक्षाही अधिक पदे रिक्त असल्याची माहिती आहे. त्यातील गट-‘ब’मध्ये अंदाजे २३ ते २७, गट-‘क’मध्ये अंदाजे १५०, गट-‘ड’मध्ये पाचपेक्षाही अधिक पदे रिक्त आहेत. बिंदूनामावली अंतिम मंजुरीनंतर त्या सर्वांना पदोन्नतीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेची गठित समितीजिल्हा परिषदेच्या पदोन्नती समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, तर सदस्य म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र), समाजकल्याण अधिकारी, सर्व विभाग प्रमुखांचा समावेश आहे.पदोन्नतीने भरावयाची पदेपदोन्नतीने भरावयाच्या पदांमध्ये सहायक प्रशासन अधिकारी-१, कनिष्ठ प्रशासन अधिकारी-६, वरिष्ठ सहायक-७, कनिष्ठ सहायकांची ३० पदे भरली जाणार आहेत. या पदांवर त्याखालील पदांच्या संवर्गातून पदोन्नती मिळणार आहे.