शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पारस प्रकल्प विस्तारीकरणाबाबत २0 सप्टेंबरला मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:46 IST

पारस प्रकल्प विस्तारीकरणात ६६0 मेगावॉट क्षमतेच्या नवीन संचाची उभारणी करण्याकरिता सर्वपक्षीय समन्वय समितीची बैठक ४ सप्टेंबर रोजी नागपूर येथे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीस जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अन्य पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत याबाबत चर्चा होऊन, या विषयावर निर्णय घेण्यासाठी २0 सप्टेंबर रोजी मुंबईत बैठक घेण्याची सूचना ऊर्जामंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना केली

ठळक मुद्देनागपूरच्या बैठकीत ऊर्जामंत्र्यांनी अधिकार्‍यांना केली सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कपारस : पारस प्रकल्प विस्तारीकरणात ६६0 मेगावॉट क्षमतेच्या नवीन संचाची उभारणी करण्याकरिता सर्वपक्षीय समन्वय समितीची बैठक ४ सप्टेंबर रोजी नागपूर येथे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीस जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अन्य पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत याबाबत चर्चा होऊन, या विषयावर निर्णय घेण्यासाठी २0 सप्टेंबर रोजी मुंबईत बैठक घेण्याची सूचना ऊर्जामंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना केली.नागपूर येथे ऊर्जामंत्र्यांच्या निवासस्थानी ४ सप्टेंबर रोजी पारस येथे ६६0 मेगावॉट वीज निर्मिती क्षमतेचा नवीन संच उभारण्याच्या विषयाबाबत चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील आ. बळीराम सिरस्कार यांच्यासह सर्वपक्षीय समिती व संबंधित अधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पारस येथे ६६0 मेगावॉट वीज निर्मितीच्या नवीन संचाची उभारणी करण्याकरिता आ.बळीराम सिरस्कार मागील चार वर्षांपासून पाठपुरावा व पत्रव्यवहार करीत आहेत. या बैठकीत भाजपा जिल्हाध्यक्ष तेजराव पाटील थोरात यांनी आक्रमक भूमिका घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडून सदर प्रकल्पाची आवश्यकता आग्रही शब्दात मांडली.  जिल्हाध्यक्ष थोरातांचे आक्रमक रूप पाहून ऊर्जामंत्री बावनकुळे काही क्षण नि:शब्द झाले व त्यांनी या विषयावर निर्णय घेण्यासाठी वेळ मागितला. या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी संबंधित सर्व अधिकारी अकोला जिल्ह्यातील खासदार, सर्व आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधी व समन्वय समितीचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत मुंबई येथे २0 सप्टेंबर रोजी निर्णायक बैठक घेण्याबाबत ऊर्जामंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना केली.पारस परिसरातील गावांमध्ये निर्माण झालेल्या दूषित पाण्याच्या पृष्ठभूमीवर प्रत्येक गावात शुद्धजल प्रकल्प उभे करण्यास होत असलेली प्रशासकीय दिरंगाई ऊर्जामंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली असता, त्यांनी याबाबत लवकरच प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून सामाजिक बांधीलकी अतंर्गत अशा प्रकल्पांची उभारणी करण्याबाबत आश्‍वासित केले.यावेळी आ. बळीराम सिरस्कार, भाजपा जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, शिवसेना तालुकाप्रमुख संजय शेळके,भाजपा तालुकाध्यक्ष विलास पोटे, आकाश पाटील दांदळे, अमोल साबळे, रतन गिरी यांच्यासह समन्वय समितीचे आयोजक मुरलीधर राऊत, श्रीकृष्ण इंगळे, सुरेंद्र रौदळे आदी उपस्थित होते.