शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

वर्षातून आठ वेळा होणार संजय गांधी निराधार योजनेची बैठक

By admin | Updated: August 10, 2015 00:58 IST

सामाजिक न्याय विभागाचे आदेश; प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी होणार मदत.

बुलडाणा : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी निराधार समितीच्या बैठका वर्षभरात किमान आठवेळा ठरवून दिलेल्या तारखेला घेण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी मदत होणार आहे. संजय गांधी निराधार योजनेतून निराधार व्यक्तींना दरमहा निश्‍चित वेतन देण्यात येते; मात्र या योजनेतून लाभार्थ्यांना अर्ज केल्यानंतर दोन-दोन वर्षानंतरही लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी प्रत्येक तहसील कार्यालयात दाखल होत आहेत. या तक्रारींचे निरसन करण्यासाठी तसेच प्रलंबित प्रकरणाचा निपटारा होण्याच्या दृष्टीकोनातून सामाजिक न्याय विभागाने ४ ऑगस्ट रोजी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यापुढे वर्षभरात निराधार समितीच्या आठ बैठका निश्‍चित केलेल्या तारखेच्या दिवशी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती, १0 मार्च सावित्रीबाई फुले पुण्यतिथी, ११ ते १४ एप्रिल महात्मा ज्योतीबा फुले जयंती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, २७ मे रमाबाई आंबेडकर यांची पुण्यतिथी, २६ जून राजङ्म्री छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती व ६ डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन यांचा समावेश आहे. या दिवशी शासकीय सुट्टी किंवा अन्य रजा येत असल्यास या तारखेच्या पुर्वीच्या किंवा नंतरच्या तीन दिवसाची तारीख निश्‍चित करण्याचे आदेशात नमूद केले आहे. संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष बैठकीस गैरहजर राहिल्यास तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या बैठका घेण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

*तहसीलदारांवर जबाबदारी

        सामाजिक न्याय विभागाने दिलेल्या तारखेस बैठका घेण्याची संपूर्ण जबाबदारी प्रत्येक तालुक्याच्या तहसिलदारांवर सोपविण्यात आली आहे. या दरम्यान बैठका न झाल्यास तहसिलदारांना जबाबदार धरण्यात येणार आहे. बैठक इनकॅमेरा घेण्याचे निर्देशही देण्यात आलेत.